Nawab Makik Vs Devendra Fadanvis: देवेंद्र 'फडणवीसांच्या संरक्षणाखाली सुरू होते बनावट नोटांचे रॅकेट, त्यांनी साडे १४ कोटींच्या फेक नोटांचे प्रकरण दाबले', नवाब मलिकांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:59 AM2021-11-10T10:59:06+5:302021-11-10T11:06:21+5:30

Nawab Malik Allegations on BJP Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध (Devendra Fadnavis Underworld connection) असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता.

Nawab Makik Vs Devendra Fadanvis: Devendra Fadanvis pressed for 14 and a half crore fake notes case, serious allegations of Nawab Malik | Nawab Makik Vs Devendra Fadanvis: देवेंद्र 'फडणवीसांच्या संरक्षणाखाली सुरू होते बनावट नोटांचे रॅकेट, त्यांनी साडे १४ कोटींच्या फेक नोटांचे प्रकरण दाबले', नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Nawab Makik Vs Devendra Fadanvis: देवेंद्र 'फडणवीसांच्या संरक्षणाखाली सुरू होते बनावट नोटांचे रॅकेट, त्यांनी साडे १४ कोटींच्या फेक नोटांचे प्रकरण दाबले', नवाब मलिकांचा गंभीर आरोप

Next

मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी काल नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हायड्रोजन बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, मलिक यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रात बनावट नोटांचा खेळ सुरू होता. साडे  १४ कोटींच्या बनावट नोटा सापडल्यानंतर हे प्रकरण फडणवीस यांनी दाबल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. (NCP Leader Nawab Malik hydrogen bomb on BJP leader Devendra Fadnavis Underworld connection)

याबाबत मोठा गौप्यस्फोट करताना नवाब मलिक म्हणाले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर केली होती. नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल. काळा पैसा, बनावट नोटा संपुष्टात येतील असा दावा करण्यात येत होता. नोटाबंदी झाल्यानंतर देशातील विविध भागात बनावट नोटा सापडल्या. मात्र महाराष्ट्रात ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत बनावट नोटांचे एकही प्रकरण समोर आली नव्हेत. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी मुंबईतील बीकेसीमध्ये छापेमारी झाली. त्यात १४ कोटी ५६ लाखांच्या बनावट नोटा सापडल्या. मात्र हे प्रकरण दाबून टाकण्यास देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली. बनावट नोटांचा धंदा देवेंद्र फडणवीस यांच्या संरक्षणाखाली चालत होता, असा दावा मलिक यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणामध्ये मुंबईतून एका व्यक्तीला अटक झाली. तर  पुण्यातही एकाला अटक करण्यात आली. इम्रान आलम शेख असे यामध्ये अटक झालेल्या एका व्यक्तीचे नाव होते. याप्रकरणी नवी मुंबईतही अटकेची कारवाई झाली. पण १४ कोटी ५६ लाख किमतीच्या बनावट नोटांचे हे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांच्या बानावट असल्याचे दाखवून दाबले, असा आरोप मलिक यांनी केला. हे बनावट नोटांचे प्रकरण एनआयएकडे का सोपवले गेले नाही,असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

Web Title: Nawab Makik Vs Devendra Fadanvis: Devendra Fadanvis pressed for 14 and a half crore fake notes case, serious allegations of Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.