'नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, मोदी अन् अमित शहांसमोर माझ्याबद्दल तसं मत निर्माण केलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:33 PM2020-09-08T21:33:55+5:302020-09-08T21:35:35+5:30

एकनाथ खडसेंनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो.

'Nathabhau is a villain, Fadnavis formed such an opinion about me at the senior level, eknath khadase | 'नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, मोदी अन् अमित शहांसमोर माझ्याबद्दल तसं मत निर्माण केलं'

'नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, मोदी अन् अमित शहांसमोर माझ्याबद्दल तसं मत निर्माण केलं'

Next

मुंबई - मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी स्पष्टपणेच देवेंद्र फडणवीसांचे नाव घेऊन राजकारण सांगितलं. 

एकनाथ खडसेंनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, मी या पदाच्या शर्यतीतही होतो. मात्र, माझ्यावर आरोप करुन मला बाजुला करण्यात आलं. पंकजा मुंढे या मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असं म्हटल्या, त्यांनाही पद्धतशीरपणे हटवलं गेलं. विनोद तावडेंच्या बाबतीतही तेच घडलं, असे म्हणत एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा आपली खदखद व्यक्त केली आहे. तसेच, वरिष्ठांकडे माझ्याबद्दल चुकीचे गैरसमज पसरविण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मला व्हिलन करण्यात आलं. वरिष्ठ पातळीवरील माझेही काही सहकारी मित्र, नेतेमंडळी मला सांगतातच की, आणि हे कुणी केलं सर्वांना माहितीय, असे खडसेंनी म्हटले. 

वरिष्ठांकडे देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याबद्दल जे काही वातावरण निर्माण केलं, मी भेटतो, मी बोलतो. मला वरिष्ठ नेते मंडळी सांगतात, आपके बारे मे गलत सलत यहाँ रखा है, म्हणजे माझ्याबाबतीत इतकं वाईट मत करुन ठेवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही चांगली व्यक्ती आहे, हे आता वरचे लोकं विसरले आहेत, नाथाभाऊ म्हणजे व्हिलन, असे म्हणत खडसेंनी फडणवीस यांच्यावर थेट प्रहार केला.  

यापूर्वीही थेट निशाणा

यापूर्वीही खडसे म्हणाले होते, मला मंत्री मंडळातून काढले, आमदारकीचे तिकीट नाकारले, याचे मला कोणतेही दु:ख नाही. परंतु विविध खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचा कट व पक्षांतर्गत आप्तस्वकियांनी केलेले बदनामीचे षडयंत्र जिव्हारी लागले आहे. आतापर्यंत माझ्याकडे या कटकारस्थानाचे पुरावे नव्हते आता पुरावे जमा झाले आहेत. त्यामुळे ते मी जनते समोर आणणार आहे. दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप तसेच पुण्याची ती जमीन एमआयडीसीची आहे, हा दावा होऊ शकत नाही. एका पाठोपाठ एक आरोप करीत चौकशी लागली. सर्वांना क्लीन चिट मिळाली, पण माझा छळ सुरुच राहिला. निवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचे ते म्हणाले. 

दाऊदच्या बायकोला फोन केला हा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळे यात कसा आला. माजी मंत्री कृपाशंकर, समाजसेविका अंजली दमानिया असे एका पाठोपाठ या प्रकरणात कसे आले. बातम्या पेरल्या व माझी मीडिया ट्रायल कशी सुरू झाली. याचे सबळ पुरावे मी ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ या पुस्तकात देणार असल्याचे खडसे म्हणाले.
 

Web Title: 'Nathabhau is a villain, Fadnavis formed such an opinion about me at the senior level, eknath khadase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.