मुंबई म्हाडा काढणार ४ हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण योजना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 06:59 AM2023-05-20T06:59:01+5:302023-05-20T06:59:17+5:30

सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये ‘म्हाडा’च्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल. 

Mumbai MHADA will draw lottery of 4 thousand houses; Know the complete plan | मुंबई म्हाडा काढणार ४ हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण योजना 

मुंबई म्हाडा काढणार ४ हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या संपूर्ण योजना 

googlenewsNext

मुंबई : ‘म्हाडा’च्यामुंबई मंडळाच्या वतीने ४ हजार ८३ घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, यासाठी ऑनलाइन अर्जाची सुरुवात २२ मे रोजी दुपारी ३ वाजल्यापासून होईल. २६ जूनच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार असून, ऑनलाइन पेमेंट २६ जूनच्या रात्री ११:५६ वाजेपर्यंत करता येईल. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे २८ जूनपर्यंत करता येईल. तर १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात काढली जाईल.

सदनिका विक्रीकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल त्यावेळेस अर्जदारांना अर्ज रक्कम व अनामत रक्कम भरण्याकरिता लिंक खुली करण्यात येईल. ज्यामध्ये ‘म्हाडा’च्या बँक खात्याबाबतची माहिती नमूद करण्यात येईल. 

सोडतप्रक्रियेत सहभागी होण्याकरिता https://www.mhada.gov.in तसेच https://housing.mhada.gov.in याच म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळांचा वापर करावा.

अर्ज शुल्क - ५०० 
जीएसटी - ९० 
एकूण - ५९०

कुठे किती घरे
- प्रधानमंत्री आवास योजना 
(शहरी) : १९४७ 
- म्हाडा : १७९५ 
- विकास नियंत्रण नियमावली 
३३ (५) : १३९ 
- विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) बांधकाम सुरू : ७५ 
- विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) २५ 
- विखुरलेल्या सदनिका १०२ 

Web Title: Mumbai MHADA will draw lottery of 4 thousand houses; Know the complete plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.