Mumbai Electricity : मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडित होताच मुख्यमंत्र्यांचा ऊर्जामंत्र्यांना फोन; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 01:03 PM2020-10-12T13:03:34+5:302020-10-12T13:15:40+5:30

Mumbai Electricity : रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, जेणेकरून अडचण होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत.

Mumbai Electricity : Chief Minister's instruction to make every effort to streamline power supply | Mumbai Electricity : मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडित होताच मुख्यमंत्र्यांचा ऊर्जामंत्र्यांना फोन; म्हणाले...

Mumbai Electricity : मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडित होताच मुख्यमंत्र्यांचा ऊर्जामंत्र्यांना फोन; म्हणाले...

Next
ठळक मुद्देमुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला.

मुंबई : मुंबईमध्ये आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाचवेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. मात्र, आता टप्प्या टप्प्यानं वीजपुरवठा सुरू होत आहे. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली असून मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, भविष्यात परत अशी घटना घडू नये. यासाठी सतर्कता बाळगावी असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत. यासाठी कोण जबाबदार आहेत, त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

याचबरोबर, रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, जेणेकरून अडचण होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या आहेत. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षाला सांगितले आहे. तसेच, उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या कळवा-पडघा आणि खारघर उपकेंद्रांमधील वीज वाहिन्यांमध्ये आणि ट्रान्फॉरमर्समध्ये अनेक ठिकाणी ट्रीपिंग झाले. मुंबई आणि उपनगरांना होणाऱ्या वीजपुरवठ्यापैकी ३६० मेगावॅट पुरवठ्याला याचा फटका बसला. हा तांत्रिक बिघाड दूर करुन वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम तातडीने सुरु आहे. तसेच, काही भागांत वीज पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

तासाभरात मुंबईतला वीजपुरवठा सुरळीत होणार - उर्जामंत्री
एक तासामध्ये मुंबईतला वीज पुरवठा सुरळीत होईल, असे ट्विट उर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच,  महापरेषणच्या कळवा-पडघा जीआयएस केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज पुरवठा खंडीत झाला. याच्या cascading effect मुळे मुंबई आणि व उपनगरांमधली वीजही खंडीत झाली आहे. महापरेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत, असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

Web Title: Mumbai Electricity : Chief Minister's instruction to make every effort to streamline power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.