Coronavirus: मोठा दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 04:52 PM2021-06-14T16:52:12+5:302021-06-14T16:54:43+5:30

Coronavirus: गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे धारावीला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले होते.

mumbai dharavi records zero cases of corona as per bmc | Coronavirus: मोठा दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

Coronavirus: मोठा दिलासा! धारावीत शून्य रुग्णांची नोंद; कोरोनामुक्तीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

Next
ठळक मुद्देदादर, माहीममध्ये नियंत्रण मिळवण्यात यशधारावीत शून्य कोरोना रुग्णांची नोंदमुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ६५३ दिवसांवर

मुंबई:मुंबईकरांसाठी दिलासादायक वृत्त आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी परिसरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यापासून धारावीबाबत सर्वांना अधिक चिंता वाटत होती. त्यादृष्टिने पावलेही उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. (mumbai dharavi records zero cases of corona as per bmc)

गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे धारावीला कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले होते. धडकी भरेल. अशी कोरोना रुग्णसंख्या धारावीमध्ये पाहायला मिळाली होती. मात्र, 'मिशन झिरो', 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' यासह पालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी संस्था अशा कोरोना योद्ध्यांच्या योगदानामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाविरोधात दिलेला लढा यशस्वी ठरल्याचे सांगितले जात आहे. 

गेल्या २४ तासांत एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी भागात गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाचा नवा एकही रुग्ण न आढळणे ही मोठी दिलासादायक बाब आहे. तब्बल चार महिन्यानंतर पहिल्यांदा धारावीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. धारावीची कोरोना मुक्तीच्या दिशेने होणारी ही वाटचाल अनेक ठिकाणी धारावी मॉडेल नावाने कोरोना विळख्यापासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शकही ठरली.

तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!

दादर, माहीममध्ये नियंत्रण मिळवण्यात यश

धारावी विभागात आतापर्यंत करोनाबाधित ६८६१ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीपाठोपाठ दादर आणि माहीम भागात कोरोनाचा नियंत्रणात येत असल्याचे सांगितले जात आहे. दादर भागात आतापर्यंत ९ हजार ५५७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सोमवारी केवळ ३ रुग्ण सापडले आहेत. तर, माहिममध्ये दिवसभरात ६ रुग्णांची नोंद झाली आहे.

“नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय पंतप्रधान व्हावसं, पण...”; भाजपचा टोला

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ७०० नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार १८३ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ७७३ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ६५३ दिवसांवर गेला आहे. 
 

Web Title: mumbai dharavi records zero cases of corona as per bmc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.