Rupali Chakankar : "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?" 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 03:09 PM2021-10-21T15:09:50+5:302021-10-21T15:44:41+5:30

Rupali Chakankar And MNS Shalini Thackeray : मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी रुपाली चाकणकर यांना सणसणीत टोला लगावला आहे.

MNS Shalini Thackeray Slams Rupali Chakankar Over State Women Commission | Rupali Chakankar : "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?" 

Rupali Chakankar : "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय?" 

googlenewsNext

मुंबई - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी (State Women Commission) राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांनीचं त्याचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच उल्लेखनीय काम कराल असा विश्वास व्यक्त करत अनेकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र याच दरम्यान मनसेने चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?" असं म्हणत मनसेने निशाणा साधला आहे. 

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Shalini Thackeray) यांनी रुपाली चाकणकर यांना सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सरकार स्थापन होऊन २ वर्षांनी महिला आयोगाचा अध्यक्ष नेमण्याला मुहूर्त मिळाला ही बाब आनंदाची आहे. पण मेळावे घेणे आणि चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर देणे यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..?" असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे. याआधी देखील मनसेने विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

"राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी 'शुर्पणखा' बसवू नका"

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी देखील याआधी चाकणकरांवर टीका केली होती. "महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका... अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल" असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 


 

Web Title: MNS Shalini Thackeray Slams Rupali Chakankar Over State Women Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.