मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 11:29 AM2021-01-23T11:29:53+5:302021-01-23T11:34:43+5:30

signature in Marathi news स्वाक्षरी शिकविण्यासाठी बुलडाण्याच्या सुलतानपूर येथील कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Ministry officials, learn signature in Marathi | मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका

मंत्रालयातील अधिकाऱ्यांनाे, मराठीत सही शिका

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी भाषा विभागाने मराठीत सही शिकावे यासाठी पुढाकार घेतला आहे.कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

अकाेला : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त राज्याच्या मराठी भाषा विभागाने मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना मराठीत सही शिकावे यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठीत आकर्षक स्वाक्षरी शिकविण्यासाठी बुलडाण्याच्या सुलतानपूर येथील कलावंत गाेपाल वाकाडे यांना आमंत्रित करण्यात आले असून, ते २८ जानेवारीला मराठीत सही शिकविणार आहेत.

बुलडाण्याच्या लाेणार तालुक्यातील सुलतानपूरच्या श्री सिद्धेश्वर विद्यालयातील कलाशिक्षक गाेपाल वाकाेडे हे गेल्या पंधरा वर्षांपासून मराठी भाषेत सही कशी करायची याचे नमुने शिकवितात. त्या नमुन्यानुसार प्रत्येकाने सराव करून तशी रूबाबदार सही करावी हा त्यांच्या मानस आहे. नाशिक येथे भरलेल्या साहित्य संमेलनात वाकाेडे यांनी मराठीत सही शिका असा स्टाॅल लावला हाेता. त्याला मराठी भाषकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तेव्हापासून प्रत्येक साहित्य संमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात ते लाेकांना सही शकवित आहेत. यंदा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी भाषा विभागाने त्यांना २८ जानेवारी राेजी मंत्रालयात आमंत्रित केले आहे. मंत्रालयीन कामकाजात मराठी भाषेचे प्रमाण वाढावे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठीत सही शिकविण्याचा हा प्रयत्न उत्तम आहे.

Web Title: Ministry officials, learn signature in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.