महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 09:31 AM2021-05-01T09:31:54+5:302021-05-01T09:38:06+5:30

Coronavirus In Maharashtra : कोरोनाच्या महासाथीतही महाराष्ट्र डगमगणार नाही, पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

minietr jayant patil on maharashtra day will fight against covid praises doctors and health workers | महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी- सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत : जयंत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या महासाथीतही महाराष्ट्र डगमगणार नाही, पाटील यांनी व्यक्त केला विश्वासकणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेणार : जयंत पाटील

"महाराष्ट्राने आतापर्यंत अनेक अस्मानी - सुलतानी संकटाला तोंड दिले, पण संकटासमोर कधी हात टेकले नाहीत. कोरोनाच्या महामारीत देखील महाराष्ट्र डगमगणार नाही," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील जनतेला आणि कामगारांना शुभेच्छा दिल्या. 

"डॉक्टर व आरोग्य सेवेतील प्रत्येकजण आपल्या प्राणाची पर्वा न करता लढत आहेत. जनता संयमाने शासनाचे नियम पाळत आहेत. सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून आपला कणखर महाराष्ट्र पुन्हा मोकळा श्वास घेईल हे नक्की," असं जयंत पाटील यावेळी म्हणाले. दरम्यान यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी तसेच कोरोना विरुध्द लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व वीरांना जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली.

अजित पवारांकडून केंद्रावर निशाणा

सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात पाठवल्यामुळे आपल्याला लसींची कमतरता जाणवत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. सुरुवातीला तयार झालेली लस दुसऱ्या देशात पाठवायची काहीही गरज नव्हती असे आपले स्पष्ट मत असल्याचं पवार म्हणाले. "१८ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची सुरुवात करायचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी एक रकमी पैसे भरायचे आमचे नियोजन होते. पण लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्र सरकारने हाती घेतला आहे. भारत बायोटेक कडे लस मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. पण आज फक्त तीन लाख लसी मिळालेल्या आहेत. पुण्याला फक्त २० हजार लसी मिळाल्या आहेत. यामुळेच परदेशातील लस आपल्याकडे आयात करता येईल का याबाबत विचार सुरू आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: minietr jayant patil on maharashtra day will fight against covid praises doctors and health workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.