मराठवाडा वॉटरग्रीड योजना नव्या सरकारच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:28 AM2020-01-31T10:28:11+5:302020-01-31T10:29:30+5:30

यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी निधी राखीव ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली का, यावर अजित पवार यांनी काहीही सांगितले नाही. मात्र प्रकल्प योग्य असल्यास पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करू, अस ते म्हणाले.

Marathwada Watergrid Project will Investigate by specialist | मराठवाडा वॉटरग्रीड योजना नव्या सरकारच्या रडारवर

मराठवाडा वॉटरग्रीड योजना नव्या सरकारच्या रडारवर

googlenewsNext

मुंबई - आधीच्या युती सरकारने मराठावाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी वॉटरग्रीड योजना सुरू करण्याचा निर्धार केला होता. मात्र नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारच्या रडावर ही योजना आली आहे. योजना तांत्रिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा तापसला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

यंदाच्या अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटरग्रीड प्रकल्पासाठी निधी राखीव ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे ही योजना सरकारने गुंडाळली का, यावर अजित पवार यांनी काहीही सांगितले नाही. मात्र प्रकल्प योग्य असल्यास पुरवणी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करू, अस ते म्हणाले.

ज्या भागात पाणी अधिक असेल तेथून ते उचलून पाण्याचं दुर्भिक्ष असलेल्या भागात पाईपलाईनद्वारे पाणी देणे याला वॉटरग्रीड म्हणतात. कोकणातील वाहून जाणारे पाणी वॉटरग्रीडद्वारे मराठवाड्यात आणण्याचे नियोजन या योजनेतून करण्यात आले होते. मात्र आता या प्रकल्पाची प्रतीक्षा वाढणार आहे. हा प्रकल्प तज्ज्ञांनी तपासल्यानंतर निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली आहे. त्यामुळे तपाणीनंतरच या प्रकल्पाचा सोक्षमोक्ष लागणार आहे.  

Web Title: Marathwada Watergrid Project will Investigate by specialist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.