अकरावी प्रवेशात ठाकरे सरकार 12 टक्के मराठा आरक्षण देणार, तर दिव्यांगांना 4 टक्के मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 05:26 AM2020-06-24T05:26:30+5:302020-06-24T06:32:52+5:30

आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे १२% करण्यात आले आहे, तर अपंग आणि दिव्यांगांसाठी असलेले ३% आरक्षण हे ४ % करण्यात आले आहे.

Maratha reservation for 11th admission 12% and for disabled 4% | अकरावी प्रवेशात ठाकरे सरकार 12 टक्के मराठा आरक्षण देणार, तर दिव्यांगांना 4 टक्के मिळणार

अकरावी प्रवेशात ठाकरे सरकार 12 टक्के मराठा आरक्षण देणार, तर दिव्यांगांना 4 टक्के मिळणार

Next

मुंबई : दहावीचा निकाल जुलै अखेरीस लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर केल्यानंतर लगेचच अकरावी प्रवेश प्रक्रियेस शिक्षण विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुसुत्रता आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून आरक्षण आणि प्रवेश प्रक्रियेतील तरतुदींमध्ये बदल केले आहेत. यातील मोठा बदल म्हणजे एसईबीसीसाठी (सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग) असलेले आरक्षण उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे १२% करण्यात आले आहे, तर अपंग आणि दिव्यांगांसाठी असलेले ३% आरक्षण हे ४ % करण्यात आले आहे.
मुंबई आणि पुण्यातील महापालिका चालविण्यात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांतील ५० टक्के जागा या त्या त्या महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इनहाऊस कोटा म्हणून राखीव ठेवण्यात याव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे पालिका शाळांतून उत्तीर्ण होणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.
मराठा व अपंग / दिव्यांग याव्यतिरिक्त असणारे संविधानिक आरक्षण अल्पसंख्याकासाठी राखीव कोटा, व्यवस्थापन कोटा इत्यादीसाठीच्या राखीव जागांचे प्रमाण सध्या असलेल्या प्रक्रियेप्रमाणेच राहणार आहे. आरक्षणाप्रमाणे प्रवेश प्रक्रियेच्याही काही तरतुदींमध्ये यंदा बदल करण्यात येणार आहे. दरवर्षी बायफोकल अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ही अकरावीच्या प्रवेशाच्या शून्य फेरीमध्येच करून घेतले जातात. मात्र यंदा ते शून्य फेरीमध्ये आयोजित न करता नियमित फेरीत समांतर प्रवेश प्रक्रिया म्हणून आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच विशेष फेऱ्यांनंतर राबविण्यात येणाºया एफसीएफएस (प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य) फेºया ही यंदा रद्द करण्यात येणार आहेत. त्याऐवजी आवश्यकता असल्यास अतिरिक्त विशेष फेरी राबविण्यात यावी जेथे सर्व रिक्त जागा या सर्वसाधारण जागांमध्ये रूपांतरित करण्यात येतील आणि आरक्षणाऐवजी गुणवत्ता यादीतील गुणांवर आधारित जागा देण्यात येतील.
प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष अतिरिक्त फेरीमध्ये प्रवेश घेऊ शकतील. घेतलेले प्रवेश रद्द केलेले तसेच शाखा व महाविद्यालय बदल करू इच्छिणारे विद्यार्थी आधीचे प्रवेश रद्द करून विशेष फेरी १ आणि त्यानंतरच्या विशेष फेºयांमध्ये सहभागी होऊ शकतील.
>गरजेनुसार विशेष फेरीचे आयोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग नियमांचे पालन व्हावे याकरिता सर्व प्रक्रिया जास्तीत जास्त डिजिटली करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करत आहे. विद्यार्थ्यांना प्रक्रिया शुल्क केवळ आॅनलाइन पद्धतीने भरण्याबाबत मान्यता देण्यात यावी असे नवीन तरतुदीत नमूद आहे. विद्यार्थ्यांनीही फिजिकल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गरज भासल्यास अतिरिक्त विशेष फेºयांचे आयोजन करता येईल.
>विशेष फेरीचे आयोजन
नियमित फेरी संपल्यानंतर एका विशेष फेरीचे आयोजन करण्यात यावे. त्यानंतर आवश्यकता असल्यास अतिरिक्त विशेष फेºयांचे आयोजन करण्यात येईल. बारावीच्या प्रवेशासाठी स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत.

Web Title: Maratha reservation for 11th admission 12% and for disabled 4%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.