Maharashtra Vidhan Sabha 2019 Investigate decisions taken from 16st to 21th September | Vidhan Sabha 2019: '१६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा'
Vidhan Sabha 2019: '१६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा'

मुंबई : १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत या काळात सरकारने घेतलेल्या निर्णयामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असल्याने या सर्व निर्णयांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी लोकायुक्तांकडे केली आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी अनेक मंत्र्यांनी स्वपक्षातल्या कार्यकर्त्यांना राजकीय व आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी अनेक अर्थपूर्ण निर्णय अत्यंत घाईगडबडीत घेतले. सरकारचे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झालेले आहे. अनेक निर्णय आधी घेतल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून १६ सप्टेंबरपासूनच्या सर्व निर्णयांची चौकशी करावी. आचारसंहितेनंतर कोणत्याही निर्णयाची माहिती शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित करण्यास मनाई करावी व संबंधित निर्णय तात्काळ रद्द ठरवावेत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.


Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Investigate decisions taken from 16st to 21th September
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.