Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:34 AM2019-09-22T03:34:45+5:302019-09-22T03:35:15+5:30

राष्ट्रवादीला फटका; छोट्या पक्षांची कोंडी

Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP rally against Konkan with Mumbai | Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

Vidhan Sabha 2019: मुंबईसह कोकणात भाजपवर सेना भारी

Next

- विनायक पात्रुडकर

मुंबई : मुंबई- ठाणे, कोकणातील संख्याबळात सध्या शिवसेना मोठा भाऊ असली, तरी तळकोकणात नारायण राणे यांना भाजप किती बळ देते आणि गणेश नाईक यांच्या प्रवेशाचा ठाणे, रायगड, पालघरमध्ये किती प्रभाव पडतो, यावर भाजपचे मोठेपण ठरेल.

मुंबईत भायखळा, मागाठाणे, मालाड, वडाळ््याच्या जागांवरून युतीत वाद असले, तरी सध्याची शिवसेनेची मवाळ भूमिका पाहता ते सुटू शकतील. काँग्रेसमधील अंतर्गत वाद, धुगधुगी कायम असलेली राष्ट्रवादी, समाजवादी पक्षाने गमावलेला जनाधार, वंचित-एमआयएमच्या ताकदीचे विभाजन यामुळे युतीपुढे मोठे आव्हान नाही. मनसेचे इंजिन भोंगा वाजवण्याच्या तयारीत असले, तरी त्यांनी स्वत:वर मर्यादा घालून घेतल्याने ते युतीचे किती नुकसान करतील, यावरच लढतीचे चित्र ठरेल.

युतीच्या मेगाभरतीत राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा (शहापूर), अवधूत तटकरे (श्रीवर्धन), भास्कर जाधव (गुहागर) शिवसेनेत; तर संदीप नाईक (ऐरोली) भाजपमध्ये दाखल झाले. उल्हासनगरात कुमार आयलानी- ओमी कलानी या भाजप नेत्यांत टोकाचे वाद आहेत. ज्योती कलानींचे राजकारण सोयीचे बनले आहे. मीरा-भार्इंदरमध्ये युतीतून विस्तव जात नाही. त्यामुळे तेथे युती होऊनही धुसफूस कायम राहील. कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना यावेळी तगडे आव्हान देण्याची व्यूहरचना सुरू आहे. ते पाहता सध्या ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीपुढे अस्तित्वाचे आव्हान आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात भाजपचा एकही आमदार नाही. भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशामुळे गुहागरचा दावाही विरला. भाजपमुळे राज्यसभेत गेलेले नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपत विलीन करण्याचा निर्णय घेतला, तरी कणकवलीत नितेश यांचा मार्ग निर्वेध नसेल. रायगडमध्ये फक्त एक आमदार असलेल्या भाजपची भिस्त विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्यावर आहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीनपैकी एक आमदार फोडून शिवसेनेने त्यांच्या कोंडीला सुरूवात केली आहे. एन्काऊंटरफेम प्रदीप शर्मा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर नालासोपाऱ्याची लढतही कडवी बनते आहे.

प्रचारात मुद्दे काय?
मेट्रो कारशेडच्या जमिनीचा वाद, कोस्टल रोड, कोळीवाडे- धारावी, बीडीडी चाळी, अभ्युदयनगर, भेडीबाजारचा पुनर्विकास मुंबईच्या प्रचारात केंद्रस्थानी येईल.
मेट्रो, एमएमआरडीएचे रखडलेले प्रकल्प, समृद्धी-बडोदा महामार्ग, फ्रेट कॉरिडॉरचे भू संपादन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास, क्लस्टरमुळे निर्माण झालेले प्रश्न ठाणे जिल्ह्यात तीव्र आहेत.
कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात तेलशुद्ध्किरण प्रकल्प येणार की जाणार, पर्यटनाचा विकास, नवनगराची उभारणी, रोजगाराच्या अपुºया संधी चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत.

मुंबईसह कोकट पट्ट्यातील सध्याचे बलाबल
एकूण जागा- ७५
भाजप-२६
शिवसेना-२८
काँग्रेस-०६
राष्ट्रवादी-०८
इतर-०७

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 BJP rally against Konkan with Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.