Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 09:02 PM2021-06-15T21:02:24+5:302021-06-15T21:05:12+5:30

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

maharashtra reports 9350 new corona cases and 388 deaths in last 24 hours | Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Coronavirus: राज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्के; दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Next
ठळक मुद्देराज्यात दिवसभरात ९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंदराज्याचा रिकव्हरी रेट ९५.६९ टक्केमुंबईत रुग्णदुपटीचा कालाावधी ७०२ दिवसांवर

मुंबई: राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १५ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९५.६९ टक्क्यांवर गेला आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ९ हजार ३५० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. (maharashtra reports  9350 new corona cases and 388 deaths in last 24 hours) 

मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यांत ०९ हजार ३५० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत ३८८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच १५ हजार १७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर १.९ टक्के इतका आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची एकूण १ लाख ३८ हजार ३६१ इतकी आहे.

निषेध करणं मूलभूत अधिकार, दहशतवादी कृत्य म्हणू शकत नाही; हायकोर्टाने केंद्राला सुनावले

मुंबईकरांना काहीसा दिलासा

गेल्या सलग अनेक दिवसांपासून राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २० हजारांच्या खाली राहिल्याचे सांगितले जात आहे. तसेच मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ ५७५ नवीन करोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत ७१८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत १४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार २१६ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे १५ हजार ३९० उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.९ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालाावधी ७०२ दिवसांवर गेला आहे. 

श्रीरामांचे खरे भक्त असं करु शकतात, हे मान्यच नाही; ‘त्या’ घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यात एकूण ३ कोटी ८४ लाख १८ हजार १३० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५९ लाख २४ हजार ७३३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यात ९ लाख ०४ हजार ४६२ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, ५ हजार ६२१ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: maharashtra reports 9350 new corona cases and 388 deaths in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app