स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे दमदार पाऊल, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:05 PM2021-10-29T23:05:50+5:302021-10-29T23:07:40+5:30

येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील युवक-युवतींना उमेदवारी देण्याचा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतला आहे.

Maharashtra Pradesh Youth Congress has taken a big step for the local body elections | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे दमदार पाऊल, घेतला मोठा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे दमदार पाऊल, घेतला मोठा निर्णय

Next

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी २०१० सालापासून युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या पक्षांतर्गत नेमणुका लोकशाही मार्गाने निवडणूक प्रक्रिया राबवून करण्यास सुरुवात केली. सर्वसामान्य घरातील युवकांना संघटनेत आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळावी आणि पक्षांतर्गतही लोकशाही वृद्धिंगत व्हावी, हा त्यामागचा उद्देश होता.   

२७ सप्टेंबर २०१८ रोजी निवडून येऊन प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी संघटनात्मक बांधणीकरिता नवनवीन उपक्रम राबविले. त्यांनी संघटनेतही ३३% महिला आरक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील हुशार युवक-युवतींना उमेदवारी दिल्याने आज ६८९ पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि ११ जण नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांमध्ये निवडून आलेत.   

आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिराला महाराष्ट्रभरातून युवक-युवती आले होते. यावेळी सत्यजीत तांबे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी स्वतः २ वेळा लढविलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची माहिती दिली. सोशल मीडियाचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमात सत्यजीत तांबे यांनी चांगलं काम करणाऱ्या युवक-युवतींची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उमेदवारी देण्यासाठी शिफारस करणार असल्याचे स्पष्ट केले. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वसामान्य घरातील युवक-युवतींना उमेदवारी देण्याचा आणखी १ महत्वाचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने घेतला आहे.  आजच्या या प्रशिक्षण शिबिरात निवडणूक लढविण्यासाठी आवश्यक 'माध्यमे व्यवस्थापन', 'सोशल मीडिया व्यवस्थापन', 'बूथ नियोजन व व्यवस्थापन' आणि 'वक्तृत्व व व्यक्तिमत्त्व विकास' या विषयांचे मार्गदर्शन उपस्थितांना करण्यात आले.
 

Web Title: Maharashtra Pradesh Youth Congress has taken a big step for the local body elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.