Shivsena vs Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:31 AM2022-06-29T07:31:16+5:302022-06-29T21:50:18+5:30

Shivsena vs Eknath Shinde Live: राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ...

maharashtra political crises Shivsena vs Eknath Shinde Live updates marathi uddhav thackeray bhagat singh koshyari | Shivsena vs Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं

Shivsena vs Eknath Shinde Live: उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, विधान परिषदेचं सदस्यत्वही सोडलं

Next

Shivsena vs Eknath Shinde Live: राज्यातील सत्ता संघर्षात आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तसंच एकनाथ शिंदे गट आज मुंबईत परतणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. 

Shivsena vs Eknath Shinde Live Updates:

LIVE

Get Latest Updates

09:52 PM

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही - आव्हाड

सत्ता येते, सत्ता जाते पण, ह्या सगळ्यांनी केलेले सहकार्य मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे त्याबद्दल फारसे काही न बोलता आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार मानतो. कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनानी माफ करावे - जितेंद्र आव्हाड

09:46 PM

आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता, त्यांच्या रक्तानं तुम्ही उद्या रस्ते लाल करणार का? - मुख्यमंत्री

ज्या शिवसैनिकांनी या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता, त्यांच्या रक्तानं तुम्ही उद्या रस्ते लाल करणार का?, एवढं नातं तोडलं. कोणीही यांच्या अध्येमध्ये येऊ नका. लोकशाहीचा नवा पाळणा हलतोय. लोकशाहीचा पाळणा हलताना जल्लोश झाला पाहिजे.- उद्धव ठाकरे

09:44 PM

सूरत गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायचं होतं - मुख्यमंत्री

आज अशोक चव्हाण म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसवर राग असेल आम्ही बाहेर पडतो. त्यांना परत बोलवा आम्ही बाहेर पडतो. नाराजी आहे ते सूरत गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा मातोश्रीवर येऊन सांगायचं होतं. तुमच्या भावनांचा आदर करतो. ज काही आहे ते समोर येऊन बोला असं सांगितलं - मुख्यमंत्री

09:42 PM

आज न्यायदेवतेनं निकाल दिलाय. तो मान्य असायलाच पाहिजे -मुख्यमंत्री

आज न्यायदेवतेनं निकाल दिलाय. तो मान्य असायलाच पाहिजे. उद्या फ्लोअर टेस्ट करण्याचा जो आदेश दिला आहे, त्याचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला. लोकशाहीचा मान राखल्याबद्दल धन्यवाद देतो. काही जणांनी पत्र दिल्यावर लगेच आदेश दिले. विधान परिषदेच्या सदस्याची यादी मंजूर केली तर आदर वाढेल - उद्धव ठाकरे

09:40 PM

लहानपणापासून मी शिवसेना काय आहे अनुभवत आलो - उद्धव ठाकरे

लहानपणापासून मी शिवसेना काय आहे अनुभवत आलो. साधी माणसं, रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली. ज्यांनी मोठं केलं त्यांना विसरायला लागले. शक्य आहे ते सगळं दिलं, पण सर्व नाराज -उद्धव ठाकरे

09:38 PM

एखादी गोष्ट चांगली झाली की त्याला दृष्ट लागते - उद्धव ठाकरे

एखादी गोष्ट चांगली झाली की त्याला दृष्ट लागते. कोणाची दृष्ट लागते हे सांगायची गरज नाही - उद्धव ठाकरे

09:21 PM

थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात जनतेला संबोधित करणार. साडेनऊ वाजता मुख्यमंत्र्यांचं संबोधन.

09:14 PM

महाविकास आघाडीला मोठा धक्का, बहुमत चाचणी उद्याच होणार

महाविकास आघाडीला मोठा धक्का. बहुमत चाचणी उद्याच होणार. बहुमत चाचणीचा निर्णय हा पुढील निर्णयाच्या याचिकांच्या निर्णयांच्या अधीन असणार आहे असंही न्यायालयानं म्हटलंय.

08:31 PM

रात्री ९ वाजता कोर्ट निकाल देणार

उद्या बहुमत चाचणी होणार की नाही, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आता सुप्रीम कोर्ट रात्री ९ वाजता निकाल देणार.

 

08:30 PM

फ्लोअर टेस्ट पुढे ढकलण्याची सिंघवी यांची मागणी

जर न्याय द्यायचा असेल, तर एका आठवड्यानं ही फ्लोअर टेस्टची चाचणी पुढे ढकलावी किंवा उपाध्यक्षांना वरील निर्बंध थोडे कमी करा अशी सिंघवी यांची मागणी.

08:18 PM

दाखले देण्यात आलेल्या एकाही प्रकरणात अध्यक्षांच्या अधिकारावर निर्बंध नव्हते. अध्यक्षांच्या हेतूवर शंका घेतली जाते, तर राज्यपालांच्या हेतूवर का नाही?  सिंघवी यांचा न्यायालयात प्रतिवाद. 

08:18 PM

राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांना विचारणा नाही - सिंघवी

राज्यपाल हे देखील माणूस आहेत. त्यामुळेच बोम्मईंचा निकाल आला आहे. न्यायप्रविष्ट असाही उल्लेख नाही. ते पडताळणी करत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या मतासाठी ते फोनही करत नाही. ते बाधिल आहेत असं म्हणणं नाही - सिंघवी

08:05 PM

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासारखं काही घडलं नाही - तुषार मेहता

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासारखं काही घडलं नाही. नबम राबिया यांच्या निकालाचा संदर्भ. तुषार मेहतांकडून राज्यपालांच्या आदेशाचं न्यायालयासमोर वाचन

08:05 PM

थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता

तुषार मेहतांचा युक्तीवाद संपला. थोड्याच वेळात निकाल येण्याची शक्यता. सिंघवींकडून प्रतिवादाला सुरूवात.

07:58 PM

मतदान कोण करतील हे उपाध्यक्ष ठरवू शकत नाहीत - तुषार मेहता

मतदान कोण करतील हे अध्यक्ष ठरवू शकत नाहीत. कोण मतदान करतील किंवा कोण नाही हे उपाध्यक्ष ठरवू शकत नाही, तुषार मेहतांचा युक्तीवाद

07:53 PM

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना कोणच्याही सूचनेची गरज नाही, राज्यपालांचे वकील

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना कोणच्याही सूचनेची गरज नाही. त्यांना बहुमत चाचणी बोलावण्याचा अधिकार आहे. बहुमत चाचणी रोखणं न्यायाला धरून नाही - राज्यपालांचे वकील

07:48 PM

बहुमत चाचणी करणं हाच योग्य न्याय, वकिलांचा युक्तीवाद

बहुमत चाचणी करणं हाच योग्य न्याय आहे. घटनेनुसार याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली जावी, वकिलांचा युक्तीवाद.

07:43 PM

आम्हीच खरी शिवसेना, एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा दावा

आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत, एकनाथ शिंदेच्या वकिलाचा दावा. आपल्याकडे बहुमत असल्याचाही दावा न्यायालयात करण्यात आला.

07:29 PM

उद्धव ठाकरे पळपूटे नाहीत - राऊत

उद्धव ठाकरे पळपूटे नाहीत. ज्या प्रकारे पाठींबा आणि भावना त्यांच्या पाठीशी आहेत, त्याचा आदर करतील. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहतील. ज्यांना अशाप्रकारे सत्ता घ्यायची असेल ते घेऊ शकतील. येणारा काळ शिवसेनेचा असेल. पुन्हा एकदा शिवसैनिक पुन्हा मुख्यमंत्री करू - संजय राऊत

07:26 PM

मी निष्ठावंत शिवसैनिक, मला तुरूंगात टाकण्यासाठी केंद्रीय सत्ता प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय - राऊत

सकाळपासून शिवैसनिकांना नोटीस, डिटने करण्यास सुरूवात केली. उजळमाथ्यानं यायला पाहिजे आणि विधानसभेत जायला हवं. ते महान लोकं. त्यांची महानता भविष्यात कळेल. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. माझ्यासारख्या माणसालाही त्रास व्हावा, अटक व्हावी यासाठी केंद्रीय सत्ता महाराष्ट्रातील भाजपच्या मदतीनं तुरुंगात टाकण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत - संजय राऊत

06:59 PM

सत्तेत असलेला मोठा पक्षही अल्पमतात - कौल

न केवळ सरकार अल्पमतात आहे, परंतु सत्तेत असलेला मोठा पक्षही अल्पमतात. अनेकदा फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली जाते. परंतु हे सरकार ते टाळण्याचा प्रयत्न करत आहे - कौल

06:57 PM

फलोअर टेस्ट कधी टाळली जाऊ नये - कौल

फलोअर टेस्ट कधी टाळली जाऊ नये. हे घाडेबाजारापासून वाचण्याचा योग्य पर्याय आहे. अपात्र असल्याचं कारवाई प्रलंबित असल्यानं फ्लोअर टेस्ट थांबवता येऊ नये. अपात्र ठरले तर पुन्हा फ्लोअर टेस्ट होऊ शकते.

06:53 PM

माझ्याच लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली - मुख्यमंत्री

माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली. सर्वांनी केलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद, असं विधान मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं आहे.

06:52 PM

... त्यावर आजची मंत्रिमंडळाची बैठक अखेरची आहे का नाही हे ठरेल - जयंत पाटील

जर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला तर उद्या बहुमत चाचणी होईल. त्यावर आजची मंत्रिमंडळाची बैठक अखेरची आहे का नाही हे ठरेल - जयंत पाटील

06:51 PM

सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वाचे आभार मानले - जयंत पाटील

तीन पक्ष एकत्र आले, त्यांनी चांगलं सरकार चालवलं. सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वाचे आभार मानले - जयंत पाटील

06:49 PM

अपात्रतेचे निर्णय प्रलंबित आहे म्हणून फ्लोअर टेस्ट टाळणं योग्य नाही, दोन्ही गोष्टी निराळ्या - कौल

अनेकदा सत्ताधारी बहुमत चाचणी लवकर व्हावी यासाठी न्यायालयाकडे धावाधाव करतात. परंतु क्विचतच असं पाहतोय की पक्ष बहुमतापासून दूर पळतेय, कौल यांचा युक्तीवाद. सर्वोच्च न्यायालयाचे जुने दाखले दिले. अपात्रतेचे निर्णय प्रलंबित आहे म्हणून फ्लोअर टेस्ट टाळणं योग्य नाही. दोन्ही गोष्टी निराळ्या - कौल

06:46 PM

बंडखोर अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा कमी होईल - कौल

बहुमत चाचणीत कोण कोण सहभागी होऊ शकतो, न्यायालयाचा शिंदेच्या वकिलांचा सवाल.  बंडखोर अपात्र ठरले तर बहुमताचा आकडा कमी होईल. पक्षातही त्यांच्याकडे बहुमत नाही, विधीमंडळातील बहुमत दूर - कौल

06:41 PM

बहुमत चाचणी लोकशाहीतील उत्तम प्रक्रिया - कौल

बहुमत चाचणी लोकशाहीतील उत्तम प्रक्रिया. सभागृाचा विश्वास समजण्यासाठी बहुमत गरजेचं - कौल

06:36 PM

माझ्याच लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली - मुख्यमंत्री

माझ्याच काही लोकांनी दगा दिल्यानं ही परिस्थिती उद्भवली. सर्वांनी केलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद, असं विधान मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं आहे.

06:32 PM

उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय व्हावा - कौल

शिदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद सुरू. सर्वप्रथम उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय व्हावा - कौल

06:26 PM

सिंघवी यांचा युक्तीवाद पूर्ण, न्यायालयासमोर दोन पर्याय सूचवले

सिंघवी यांचा युक्तीवाद पूर्ण. ६८ मिनिटांनंतर युक्तीवाद संपला. न्यायालयासमोर दोन पर्याय सूचवले. अध्यक्षांना पात्र अपात्रतेचे निर्णय घेऊ द्या किंवा फ्लोअर टेस्ट पुढे ढकला. यापैकी एक पर्याय स्वीकारल्यास न्याय मिळेल, असा सिंघवी यांचा युक्तीवाद.

06:24 PM

व्हिप लागू करताना सुनील प्रभूंचाच व्हिप लागू होणार - सिंघवी 

याचिकाकर्ते शिवसेनेचे मुख्य प्रतोद. बंडखोर आमदारांकडून दुसऱ्या प्रतोदाची निवड. व्हिप लागू करताना सुनील प्रभूंचाच व्हिप लागू होणार - सिंघवी 

06:18 PM

मध्य प्रदेशात अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार होता - सिंघवी

मध्य प्रदेशात अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार होता. महाराष्ट्रात मात्र तो नाही. याच न्यायालयात प्रकरण असल्यानं  तो अधिकार नाही - सिंघवी

06:15 PM

फ्लोअर टेस्ट पूर्वी आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून २ हजार सीआरपीएचे जवान तैनात

उद्या सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतणार. फ्लोअर टेस्ट पूर्वी आमदारांच्या सुरक्षेसाठी केंद्राकडून २ हजार सीआरपीएचे जवान तैनात करण्यात येणार आहे. तीन विमानांनी हे जवान मुंबईत दाखल. केंद्राकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

06:09 PM

सिंघवी यांच्याकडून मध्य प्रदेशच्या खटल्याचा दाखला. मी हे वाचत आहे कारण माझे विद्वान मित्र हे प्रकरण उद्धृत करून म्हणतील की अपात्रतेची कार्यवाही प्रलंबित असतानाही फ्लोअर टेस्ट घेतली जाऊ शकते. पण महत्त्वाचा फरक असा आहे की या प्रकरणात न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिली आहे.

05:55 PM

अपात्रतेबाबत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणं गरजेचं नाही का? - सिंघवी

अपात्रतेबाबत न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणं गरजेचं नाही का? बंडखोरांसाठी इतकी घाई का? - सिंघवी यांचा युक्तीवाद.

05:53 PM

... दुसऱ्याच दिवशी फ्लोअर टेस्टची मागणी कशी करु शकतात - सिंघवी

न्यायालयासमोर निकालाची वाट पाहत असताना, नुकतेच कोविडमधून बरे झालेले राज्यपाल, विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी फ्लोअर टेस्टची मागणी कशी करू शकतात? - सिंघवी

05:50 PM

सर्व विषय राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर सोडू नये - न्यायालय 

काही निर्णय विधीमंडळात घेतले जावे. सर्व विषय राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेवर सोडू नये - न्यायालय 

05:48 PM

विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांचा निर्णय झालाचा सिँधवी यांचा युक्तीवाद

विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीनंतर राज्यपालांचा निर्णय झालाचा सिँधवी यांचा युक्तीवाद. राज्यपालांच्या प्रत्येक निर्णयाची कायदेशीर चौकशी होऊ शकते - सिंघवी. सिंघवी यांच्याकडून बोम्मई प्रकरणाचा दाखला.

05:45 PM

मंत्रिमंडळातून दोन मंत्री बाहेर पडले

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मंत्री अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड बाहेर पडले. कारण मात्र अस्पष्ट.

05:42 PM

२१ जून रोजीच हे आमदार अपात्र ठरल्याचं सिंघवी यांचं म्हणणं

मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचा निर्णय घेतला. राज्यपालांनी घाई केली. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवर झाला निर्णय. पक्षाचा आदेश न मागणारे १६ आमदार अपात्र. सुनील प्रभूंच्या याचिकेत उल्लेख. २१ जून रोजीच हे आमदार अपात्र ठरल्याचं सिंघवी यांचं म्हणणं. अध्यक्षांनी निर्मय घेतला असता तर परिस्थिती निराळी असती. न्यायालयाचं मत.

 

05:38 PM

न्यायालयासमोर ३४ बंडखोर आमदारांनी दिलेल्या पत्राचं वाचन

न्यायालयासमोर ३४ बंडखोर आमदारांनी दिलेल्या पत्राचं वाचन. रवी नाईक खटल्याच्या निकालाचाही दिला हवाला. स्वेच्छेनं पक्ष सोडलाय हे सांगण्यासाठी दाखवण्यासाठी आपहून दाखवलं पाहिजे असं नाही. काही गोष्टी किंवा कृतींचाही विचार करावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो याचा सिंघवींकडून हवाला.

05:31 PM

बहुमत चाचणीनंतर आमची बैठक होईल आणि पुढील निर्णय घेऊ - एकनाथ शिंदे 

आम्ही आसामच्या लोकांचे धन्यवाद मानतो. त्यांनी कुटुंबाप्रमाणे आम्हाला सहकार्य केलं. उद्या आम्ही मुंबईला पोहोचू. उद्या फ्लोअर टेस्टमध्ये सहभाग होऊ. सर्वोच्च न्यायालय जो काही निर्णय घेईल त्याचा आम्ही सन्मान करू. बहुमत चाचणीनंतर आमची बैठक होईल आणि पुढील निर्णय घेऊ - एकनाथ शिंदे 

05:28 PM

अपात्रतेच्या सुनावणीपूर्वी फ्लोअर टेस्ट चुकीची - सिंघवी

न्यायालयाने अपात्रतेच्या मुद्द्यावरची सुनावणी ११ जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. त्याआधी फ्लोअर टेस्ट चुकीची - सिंघवी

05:26 PM

दोन बहुमत चाचण्यांमध्ये सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक - सिंघवी

दोन बहुमत चाचण्यांमध्ये सहा महिन्यांचा कालावधी आवश्यक. जर अविश्वासाचा ठराव आणला आणि तो फेटाळला तर तो पुढचे सहा महिने आणता येत नाही, सिंघवींकडून न्यायालयाला माहिती.

05:22 PM

आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही - वकील

अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू. राज्यपालांच्या कार्यालयातील पत्र व्हायलर झालं त्याबद्दल प्रश्न करण्यात आले उपस्थित. अपात्रतेचा निर्णय झाल्यानंतरच बहुमत चाचणी योग्य. आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं वकिलांचं म्हणणं.

05:20 PM

शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू

शिवसेनेचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद सुरू. पाच ते सात मुद्दे मांडायचे असल्याचं सांगण्यात आलं.

05:16 PM

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. दरम्यान, न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

04:53 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना. आज स्वत: मर्सिडीज चालवत मंत्रिमंडळ बैठकीला निघाले आहेत. 

04:44 PM

केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत - पटोले

केंद्राच्या दबावामुळेच राज्यपाल निर्णय घेत आहेत. विधानसभा कुस्तीचा आखाडा नाही. अजून १६ आमदारांबाबत प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना राज्यपालांना एवढी कशाची घाई झाली आहे?  एवढी तत्परता विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, १२ आमदारांच्या नियुक्तीत का नाही दाखवली, असा थेट सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

04:42 PM

उद्धव ठाकरे राजीनामा देणार ?

सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयामध्ये दिलासा न मिळाल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

03:03 PM

शिंदे गटाच्या 'एग्झिट प्लान'मध्ये बदल, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आखणार रणनिती

गुवाहाटीवरुन तीन वाजताच्या सुमारास शिंदे गट गोव्यासाठी रवाना होणार होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.

02:45 PM

अल्पमतातील सरकार लोकशाहीत जबरदस्ती का करतेय?, मुनगंटीवार यांचा सवाल

अल्पमतातील सरकार लोकशाहीत जबरदस्ती का करतेय? तुमचे आमदार टिकले नाही आणि भाजपावर, राजभवनावर टीका करायची. सुपीक डोक्यातील नापीक कल्पनेला जनता भीक घालणार नाही- सुधीर मुनगंटीवर

02:40 PM

शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय - विखे-पाटील

शिवसेनेचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी एकनाथशिंदेंच्या निमित्तानं पुढे येतायत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजप म्हणून आता आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे - विखे पाटील

01:32 PM

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरही जाणार- एकनाथ शिंदे

मुंबईत पोहोचल्यावर बाळासाहेबाच्या स्मृती स्थळाला भेट देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे दिली आहे.

01:20 PM

नवाब मलिक, अनिल देशमुख यांची सुप्रीम कोर्टात धाव


राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी उद्याच्या बहुमत चाचणीतील मतदानाला हजेरी लावण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

12:47 PM

शिंदे गटातील आमदार आज गोव्याला रवाना होणार

कामाख्या देवीच्या दर्शनानंतर शिंदे गटातील आमदार गोव्याला रवाना होणार आहेत. त्यानंतर उद्या मुंबईत पोहोचणार.

12:26 PM

शिंदे गटातील आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला

11:26 AM

एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत

11:20 AM

राज्यात भाजपा अन् शिवसेनेचं सरकार स्थापन होणार; अशी आहे शिंदे गटाची स्ट्रॅटेजी

11:03 AM

संध्याकाळी ५ वाजता कागदपत्रं सादर करण्याच्या न्यायाधीशांच्या सूचना

राज्यपालांनी उद्याच बहुमत चाचणी घेण्याच्या आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली आहे. सुनावणीवेळी न्यायाधीशांनी यासंदर्भातील सविस्तर कागदपत्र सादर करण्याच्या सूचना शिवसेनेच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांना दिल्या आहेत. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कागदपत्र सादर करावी लागणार आहेत.

10:43 AM

संजय राऊत यांचं आणखी एक ट्विट

10:37 AM

शिवसेनेची बहुमत चाचणीविरोधात सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात बहुमत चाचणीविरोधात धाव घेतली असून थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होणार आहे. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी कोर्टात शिवसेनेची बाजू मांडणार आहेत.

10:22 AM

राज्यपालांकडून 'करेक्ट कार्यक्रम'!, शिरगणती, व्हिडिओ रेकॉर्डिंग अन् वेळेचं बंधन; बहुमत चाचणीच्या अटी

10:21 AM

संजय राऊत यांचा ट्विटमधून हल्लाबोल

09:56 AM

सरकार डळमळीत होण्याची भाजपा वाट पाहात होते- संजय राऊत

सरकार डळमळीत होण्याची भाजपा वाट पाहात होते. राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नेमणुकीची फाइल गेल्या अडीच वर्षांपासून धूळखात पडून असताना विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधानिक आहे. आम्ही १६ आमदारांवर कारवाईसाठीचीही पत्र दिलेलं आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टात जाऊ- संजय राऊत

09:10 AM

आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण

सुप्रीम कोर्टानं ११ जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलेलं असतानाही बहुमत चाचणी होणार असेल तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, अशी भूमिका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे. 

08:52 AM

उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन

बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवण्याचं पत्र राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी लागणार आहे.

08:44 AM

शिंदे गट उद्या मुंबईत येणार, बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी माध्यमांना माहिती दिली. तसंच उद्याच विधानसभेत बहुमत चाचणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

08:06 AM

एकनाथ शिंदे रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले

एकनाथ शिंदे सकाळी साडेसातच्या सुमारात रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले असून ते गुवाहाटीमधील कामख्या देवीच्या दर्शनाला जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

07:37 AM

मनसे नेते संदीप देशपांडे यांची शिवसेनेवर टीका

07:34 AM

शिंदे गट आज राज्यपालांना पत्र देणार

भाजपाकडून काल राज्यपालांकडे बहुमत चाचणी घेण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाकडूनही राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतलेला असल्याचं पत्र पाठवलं जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: maharashtra political crises Shivsena vs Eknath Shinde Live updates marathi uddhav thackeray bhagat singh koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.