महाराष्ट्र पोलिसांची कर्नाटकमध्ये धडाकेबाज कारवाई ; तब्बल 120 कोटी रूपयांचा गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 07:37 PM2021-01-23T19:37:05+5:302021-01-23T19:40:12+5:30

परराज्यात जाऊन छाप्याची कारवाई करण्याची पहिलीच वेळ

Maharashtra police Big action in Karnataka; Gutka worth Rs 120 crore seized | महाराष्ट्र पोलिसांची कर्नाटकमध्ये धडाकेबाज कारवाई ; तब्बल 120 कोटी रूपयांचा गुटखा जप्त 

महाराष्ट्र पोलिसांची कर्नाटकमध्ये धडाकेबाज कारवाई ; तब्बल 120 कोटी रूपयांचा गुटखा जप्त 

Next
ठळक मुद्देगुटखा विरोधी मोहिमेअंतर्गत आजपर्यंत पोलिसांकडून 28 ठिकाणी छापे

पुणे : महाराष्ट्रात अवैधमार्गाने होणारी गुटखा विक्रीची पाळमुळं शोधून काढत पोलिसांनीकर्नाटकामध्ये जाऊन तंबाखू उत्पादन आणि साठवणूक करणाऱ्या सर्व ठिकाणांवरती पथकाने छापे टाकून 120 कोटी रूपयांचा विमल गुटखा त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशिनरी जप्त केली.  परराज्यात जाऊन अशा प्रकारची छापा कारवाई महाराष्ट्र पोलिसांनी पहिल्यांदाच केली आहे. अवैध उद्योगांवरील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई आहे.

गुटखा विक्रीला आळा बसावा याकरिता पोलीस आयुक्तांनी सुरू केलेल्या गुटखा विरोधी मोहिमेंतर्गत आजपर्यंत 28 ठिकाणी छापे टाकून अवैध गुटखा  पकडण्यात आला. संबंधित पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड सहिता, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत पोलीस ठाणे चंदननगर हददीत सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, प्रवीण मुकुंद वाहुळ, नीरज मुकेश सिंगल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यात 7 लाख 50 हजार रूपयांचा गुटखा व वाहने जप्त करण्यात आली. या गुन्हयाचा तपास युनिट 4 च्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या गुन्हयाच्या तपासात प्रतिबंधित गुटख्याच्या व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल ही हवाला मार्फत होत असल्याचे निष्पन्न झाले. 

पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या मार्फत 5 हवालाद्वारे व्यवहार करून देणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकून सुमारे 4 कोटी रूपयांची रक्कम जप्त केली. चंदननगर पोलीस ठाण्याच्या छाप्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हयाच्या तपासात एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडे करण्यात आलेल्या तपासात प्रतिबंधित विमल गुटखा  याचा पुणे व इतर महाराष्ट्रातील वितरक अरूण तोलानी असल्याचे निष्पन्न झाले. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा, व्ही 1, तंबाखू हा माल  तुमकुर कर्नाटक येथील व्हीएसपीएम प्रॉडक्टस व व्ही.एस प्रॉडक्टस या उत्पादन कंपन्या अरूण तोलानी याला महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी अवैध मार्गाने पुरवठा करतात आणि 18 आरोपी विमल गुटखा व सुगंधित व्ही 1 तंबाखू स्थानिक वितरकांना पुरवतात हे समोर आले आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार एक टी कर्नाटका पाठविण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी छापा कारवाईसाठी वेगवेगळी पथके तयार केली. आणि स्थानिक पोलीसांच्या मदतीने तुमकुर येथील अंतरसनाहल्ली इंडस्ट्रीयल परिसरात छापा टाकून संबंधित ठिकाणांवरील 120 कोटी रूपयांचा विमल गुटखा त्यासाठी लागणारा कच्चा माल, मशीनरी आढळून आले. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अँथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या कार्यालयाकडून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------- 

Web Title: Maharashtra police Big action in Karnataka; Gutka worth Rs 120 crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.