राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे विक्रम गोखले खुश; बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:12 PM2020-08-19T20:12:03+5:302020-08-19T20:12:55+5:30

या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Maharashtra govt allows artist and crew members above 65 to work on Film, serial and OTT sets | राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे विक्रम गोखले खुश; बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे विक्रम गोखले खुश; बिग बींनाही दुसरा जॉब शोधायची गरज नाही!

googlenewsNext

मुंबई  - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. ६५ वर्षावरील कलाकारांना चित्रीकरण करण्यास निर्बंध असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

कोविड-19 पार्श्वभूमीवर बंद असलेली चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी यांच्या चित्रिकरणाची कामे, नियंत्रित स्वरुपात पुन्हा सुरु करण्याकरीता  मार्गदर्शक सूचना, शासन निर्णय दिनांक ३० मे २०२० व दिनांक २३ जून २०२० अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. या सूचनांमध्ये ६५ वर्षावरील कोणत्याही कलाकार / क्रू सदस्यांना चित्रीकरण स्थळावर परवानगी दिली जाणार नाही, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालाने सदरील अट रद्द करण्याचा निर्णय दिल्याने आता ६५ वर्षांवरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणात सहभागी  होण्याची मुभा राहील अशी माहितीही मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, ज्येष्ठ अभिनेते आणि सिनेमा अँड टिव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाचे मानद अध्यक्ष विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते आणि  सिंटाचे मानद उपाध्यक्ष मनोज जोशी,  उपाध्यक्ष अभिनेते दर्शन जरिवाला,  सहसचिव अभिनेते अमित बहल, अभिनेत्री राजेश्वरी सचदेव,  खजिनदार अभिनेते अभय भार्गव  यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाले होते विक्रम गोखले?

ज्येष्ठ कलाकारांना शूटिंगसाठी नो एंट्री असल्याने सरकारच्या निर्णयावर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी नाराजी व्यक्त केली होती. ६५ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्यांना सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. असा कायदा आणण्याआधी राजकारणातील ६० वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे अशी संतप्त भूमिका विक्रम गोखले यांनी घेतली होती. राज्य सरकारच्या या बंदीमुळे ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. त्यामुळे ६५ वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली होती.

अमिताभ बच्चन काय म्हणाले होते?

अनेक प्रकारच्या समस्या व चिंता आहेत, यात काहीही दुमत नाही. कोरोना काळात ६५ वर्षांवरील व्यक्ति कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही, हे सरकारी अधिकाऱ्यांनी निश्चित केले होते. माझ्या सारख्यांसाठी हे पॅकअप सारखे आहे. पण आता कोर्टाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगसाठी परवानगी दिली खरी, पण ते स्वातंत्र्य अनुभवता येत नाही. मनात कायम भीती घर करून राहते. माझ्यासाठी दुसरा कुठला जॉब असेल तर मला सांगा,’ असं बिग बींनी म्हटलं होतं.

Web Title: Maharashtra govt allows artist and crew members above 65 to work on Film, serial and OTT sets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.