महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:23 AM2019-11-05T09:23:46+5:302019-11-05T09:27:12+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही

Maharashtra Elections 2019 - 'If you love Shivaji Maharaj, make Shivendra Raje Bhosale Chief Minister Says Amol Mitkari | महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'छ. शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर शिवेंद्रराजे भोसले यांना मुख्यमंत्री करा'

googlenewsNext

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजेंना पक्षात घेतलं. साताऱ्यातून त्यांना निवडून आणायचं होतं. भाजपाने त्यांना निवडून आणायला पाहिजे होतं. शिवाजी महाराज यांच्यावर खरचं प्रेम आहे तर शिवेंद्रराजेंना मुख्यमंत्री करा. महापुरुषांच्या वारसदारांना घेऊन भाजपा सेक्युलर असल्याचा आव आणते. मात्र भाजपाची विचारधारा वेगळी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अमोल मिटकरी यांनी मागणी केली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा अमोल मिटकरी आणि अमोल कोल्हे यांनी हातात घेतली होती. प्रत्येक उमेदवार एका अमोलची सभा द्या अशी मागणी करत होते असं अजित पवारांनी सांगितले. एका मुलाखतीत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, अबकी बार २२० पार ही खोटी अपेक्षा होती. महाजनादेश, जनआशीर्वाद यात्रेला जितका प्रतिसाद मिळाला नाही त्याहून जास्त प्रतिसाद शिवस्वराज्य यात्रेला मिळाला. कलम ३७० चा उल्लेख वारंवार सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता. त्याउलट आम्ही ग्रामीण भागातील शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी याचं वास्तव आम्ही मांडत होतो. ग्रामीण भागात भाजपाला फारसं यश मिळालं नाही हे सत्य आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान अनेकांच्या रोषाला मुख्यमंत्र्यांना सामोरं जावं लागलं. शिवस्वराज्य यात्रेत ग्रामीण भागातील प्रश्नाची नाळ जोडून लोकांच्या मुद्द्याला हात घालण्याचं काम केलं असं त्यांनी सांगितले. 

तसेच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला फसविलं ही चीड लोकांच्या मनात होती. ती निकालात दिसली. भाजपाने शिवाजी महाराजांचा वापर २०१४ च्या निवडणुकीत केलं. मी स्वत: २०१४ च्या निवडणुकीत भाजपाला मत दिलं होतं. भीमा-कोरेगाव प्रकरणात दोन जातींमध्ये विष पेरण्याचं काम काहींनी केलं. भारताचं संविधान जाळण्याचा प्रकार केला या घटनांमुळे सरकारविषयी चीड निर्माण झाली. ज्या भीमा कारेगाव येथे धार्मिक सलोखा होता त्याठिकाणी अशाप्रकारे कृत्य करण्याचं काम केलं. मराठा आणि इतर समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सरकारच्या हलगर्जीपणामुळे झाला. गृहखातं मुख्यमंत्र्यांच्या हाती असताना ते अपयशी ठरले. शेतकऱ्यांच्या १६ हजार आत्महत्या झाल्या. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही याचाच राग मनात होता असा खुलासा अमोल मिटकरी यांनी केला. 

त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर आरएसएसने केला. प्रबोधनकार ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी कधी शिवसेनेने वाचला असेल असं वाटत नाही, जर वाचला असता तर त्याची अंमलबजावणी केली असती. मला अनेक धमक्या येतात, तुमचा दाभोळकर करु वैगेरे, शिवाजी महाराज हे सर्वधर्मिय होते हेच मी मांडत आलोय. शिवसेना हळूहळू बदलते, २०२४ मध्ये भाजपा शिवसेनेला संपवणार, प्रबोधनकार, बाळासाहेबांचा ठाकरी बाणा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यात नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी शिवसेनेवर केली. 

दरम्यान, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून मला राष्ट्रवादीने संधी दिली. मला अनेक पक्षांनी ऑफर दिल्या, शिवसेनेने, भाजपाने दिली. माझी विचारधारा मी शिवसेना-भाजपाच्या व्यासपीठावर मांडू शकत नाही. आरएसएसचं षडयंत्र असतं, बदनाम करणे, प्रकरणात अडकविणे, धमक्या देणे अन् नाहीच ऐकलं तर संपवून टाकायचं हे त्यांचे काम आहे असा आरोपही मिटकरी यांनी केला.    

Web Title: Maharashtra Elections 2019 - 'If you love Shivaji Maharaj, make Shivendra Raje Bhosale Chief Minister Says Amol Mitkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.