maharashtra election 2019 bjp leader Pankaja Munde fell down on the stage after emotional speech | Maharashtra Election 2019: भावनिक भाषणानंतर पंकजा मुंडेंना चक्कर; स्टेजवर कोसळल्या
Maharashtra Election 2019: भावनिक भाषणानंतर पंकजा मुंडेंना चक्कर; स्टेजवर कोसळल्या

परळी: ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंना प्रचारादरम्यान चक्कर आली. परळीतील प्रचारसभेत भावनिक भाषण केल्यानंतर मुंडे व्यासपीठावर कोसळल्या. यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

प्रचाराचा शेवट दिवस असल्यानं आज अनेक ठिकाणी पंकजा मुंडेंच्या सभा होत्या. त्यांची शेवटची सभा परळीत होती. या सभेत त्यांनी भावनिक भाषण करत मतदारांना साद घातली. मात्र भाषण संपताच त्यांना चक्कर आली आणि त्या खाली कोसळल्या. यावेळी त्यांचे पती अमित पालवे त्यांच्यासोबत होते. चक्कर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पंकजा यांना कोणताही गंभीर आजार नाही. त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिली. 


Web Title: maharashtra election 2019 bjp leader Pankaja Munde fell down on the stage after emotional speech
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.