Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 12:05 AM2021-09-05T00:05:59+5:302021-09-05T00:08:39+5:30

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली माहिती.

Maharashtra Corona Vaccination Record performance of the state 12 lakh covid vaccine doses were given in a day | Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

Maharashtra Corona Vaccination: राज्याची विक्रमी कामगिरी, दिवसभरात १२ लाख लसवंत

Next
ठळक मुद्देराज्यात एका दिवसातील झालं विक्रमी लसीकरण.

कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत महराष्ट्रात तब्बल १२ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत एका दिवसात तब्बल १२,०६,३२७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. यापूर्वी महाराष्ट्रानं २१ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी ११ लाख ४ हजार ४६४ जणांना लसीचे डोस देत सर्वाधिक संख्या नोंदवली होती. परंतु शनिवारी एका दिवसात राज्यात १२ लाखांपेक्षा अधिक लसीचे डोस देण्यात आले. सध्या लसींचे दोन्ही डोस देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.



मुंबईतही विक्रमी लसीकरण
मुंबईतही शनिवारी विक्रमी लसीकरण झालं. दिवसभरात मुंबईत १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. "मुंबईत शनिवारी दिवसभरात १.३ लाख नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ८० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी किमान लसीचा पहिला डोस घेतला आहे ही आनंदाची बातमी आहे," अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी दिली.

Web Title: Maharashtra Corona Vaccination Record performance of the state 12 lakh covid vaccine doses were given in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.