Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 05:21 PM2021-07-26T17:21:18+5:302021-07-26T17:29:26+5:30

Corona Vaccination : दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.

Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of COVID19 vaccine | Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

Corona Vaccination : महाराष्ट्राचा विक्रम! एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस

googlenewsNext

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला. (Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of COVID-19 vaccine: Maharashtra Health department)

दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे.  

आज सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.


लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झाला, असे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकते, असे डॉ.व्यास यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra becomes the first state to have over 1 crore people vaccinated with both doses of COVID19 vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.