Maharashtra Bandh : "लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 09:54 AM2021-10-11T09:54:14+5:302021-10-11T09:55:22+5:30

Maharashtra Bandh : भाजप महाराष्ट्र मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका. लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद.

Maharashtra Bandh bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government criticize them | Maharashtra Bandh : "लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण"

Maharashtra Bandh : "लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून बंद पुकारून जनतेचे लक्ष वळवण्याचं महाविकास आघाडीचं हीन राजकारण"

Next
ठळक मुद्देलखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रात पुकारण्यात आलाय बंद.

लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद(Maharashtra Bandh) हाक देण्यात आली. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना(Shivsena), काँग्रेस(Congress), राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) राज्यभरात हा बंद पुकारला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आलं. दरम्यान, यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचे हे तर हीन राजकारण महाविकासआघाडी सरकार खेळत आहे," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला आहे. 

लखीमपूरची चर्चा करूच पण इथल्या शेतकऱ्यांना मदत कधी देणार? असा सवालही उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नाना पटोले यांना ट्विटरद्वारे केला आहे. "अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात आहे. असे असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे. १०५० कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडले. महाराष्ट्रातील शेतकरी आज कमालीचा अस्वस्थ आहे," असं ते म्हणाले.

 
"राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची पूर्ण निराशा झाली आहे. लातूरला आजपासून शेतकरी हक्कासाठी ७२ तास अन्नत्याग आंदोलन होत आहे. अपयश लपवविण्यासाठी होणाऱ्या बंदपेक्षा हे आंदोलन महत्त्वाचे आहे," असं उपाध्ये म्हणाले. 

शेलार यांचाही टोला 
"बंद आणि बंद..बंद करा हे बंद..! ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवलx त्या तथाकथित 'बंदसम्राटांचा' पुन्हा आज इतिहास आठवा. मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उद्ध्वस्त केलं, युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी श्रमिकांना देशोधडीला लावलं," असं म्हणत शेलार यांनी निशाणा साधला. "एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलंय. कोस्टल रोडला विरोध, नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध, मेट्रोचेही हे विरोधकच, हे तर विकासातील गतीरोधक! बंद आणि विरोध यांचा 'धंदा' गोळा होतो त्यावरच 'चंदा'!," असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

Web Title: Maharashtra Bandh bjp leader keshav upadhye slams mahavikas aghadi government criticize them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.