Tukaram Mundhe: तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:09 IST2025-12-09T13:08:49+5:302025-12-09T13:09:46+5:30
Tukaram Mundhe Suspension Demand: सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या समर्थकाकडून धमकी दिल्याची आ. कृष्ण खोपडे यांची तक्रार. आरोपीला तातडीने अटक करावी व मुंडे वर कारवाई करावी अशी मागणी केली. आमदार प्रवीण नक्की यांनी हा मुद्दा उचलून धरला. झाली का अध्यक्षांनी सरकारला नोंद घेण्याची सूचना दिली

Tukaram Mundhe: तुकाराम मुंडे यांच्यावर कारवाईसाठी सत्ताधारी आमदार आक्रमक
नागपूर - सनदी अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या समर्थकाकडून धमकी दिल्याची आ. कृष्ण खोपडे यांची तक्रार. आरोपीला तातडीने अटक करावी व मुंडे वर कारवाई करावी अशी मागणी केली. आमदार प्रवीण दटके यांनी हा मुद्दा उचलून धरला. झाली का अध्यक्षांनी सरकारला नोंद घेण्याची सूचना दिली.
मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी केली जाईल व योग्य कारवाई होईल असे आश्वस्त केले. त्यानंतरही सत्ताधारी आमदार आक्रमक झाले. अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन कारवाईची मागणी करू लागले. तालिका अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.