प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
By आनंद डेकाटे | Updated: December 9, 2025 14:00 IST2025-12-09T13:57:26+5:302025-12-09T14:00:20+5:30
Maharashtra Assembly Winter Session 2025: राज्यातील प्रत्येक समस्येला लाडकी बहिण योजनेशी जोडणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असून ती कोणीही बंद करू शकणार नाही. “तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर लाडकी बहिण योजनेला जोडणे बंद करा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल.”, असा इशाराही त्यांनी यावेळी सदस्यांना दिला.

प्रत्येक समस्येला लाडक्या बहिणीशी जोडू नका, नाहीतर घरी बसावे लागेल, मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा
- आनंद डेकाटे
नागपूर - राज्यातील प्रत्येक समस्येला लाडकी बहिण योजनेशी जोडणे योग्य ठरणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहिण योजना सुरूच राहणार असून ती कोणीही बंद करू शकणार नाही. “तुम्ही प्रत्येक मुद्द्यावर लाडकी बहिण योजनेला जोडणे बंद करा, नाहीतर तुम्हाला घरी बसावे लागेल.”, असा इशाराही त्यांनी यावेळी सदस्यांना दिला.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अवैध गुटख्याविरोधात सुरू असलेल्या कारवाईवर चर्चा सुरू होती. या चर्चेत सहभागी होताना भाजपचे अभिमन्यु पवार म्हणाले की, अवैध दारूच्या वाहतुकीवरही कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण राज्यातील समस्या आहे. या समस्येमुळे लाडकी बहिणी प्रभावित होत आहेत. ही एक सामाजिक समस्या आहे. या संदर्भात अध्यक्षांनी राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, तरीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे लाडकी बहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार अवैध दारूविरुद्धही कठोर कारवाई करत आहे आणि कारवाई अधिक वेगाने करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात येतील.