दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 04:25 PM2020-09-10T16:25:40+5:302020-09-10T16:29:23+5:30

कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही राजकीय वातावरण तापलेले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.  शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उडी घेतली आहे. कंगनाच्या वकिलांनी बीएमसीवर आरोप केला आहे.

Loss of Rs two crore; Kangana will take criminal action against BMC | दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

दोन कोटींचे नुकसान; कंगना मुंबई महापालिकेवर गुन्हा दाखल करणार

Next

अभिनेत्री कंगना राणौतने मुंबई महापालिकेने ऑफिस तोडल्य़ानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जहरी टीका करताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही या वादात ओढले आहे. तसेच आता महापालिकेवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात असल्याचे तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सांगितले. 


महाराष्ट्र सरकारने उचललेल्या पावलावरून कंगना नाराज असून ते ऑफिस तिच्यासाठी स्वप्नांचे ऑफिस होते. वकिलाने हे देखील सांगितले की, महापालिकेने ही कारवाई कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेली आहे. कंगनाच्या ऑफिसचे जेवढे नुकसान झाले आहे त्याची एकूण रक्कम 2 कोटींच्या घरात जाते. तसेच कंगनाने उच्च न्यायालयात बीएमसीने बेकायदा कारवाई केल्याचे अॅफिडेव्हीट दिले आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्याविरोधात कारवाई करणार असे तिचे म्हणणे आहे. आज तकने सिद्दीकी यांची मुलाखत घेतली आहे.

नशीब म्हणतात! लॉकडाऊनमध्ये घर सफाईवेळी जॅक'पॉट' लागला; किंमत ऐकूनच भिरभिरला


कंगनाचे ऑफिस तोडल्यानंतर दुसऱ्या दिवशीही राजकीय वातावरण तापलेले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत.  शिवसेना विरुद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी उडी घेतली आहे. कंगनी ही हिमालच प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे, ठाकूर यांनी कंगनाला आपला पाठिंबा देत शिवसेनेला टार्गेट केलंय. 'आम्ही हिमाचलच्या सुपुत्रीचा अपमान सहन करणार नाही' असं म्हणत त्यांनी कंगनावर महाराष्ट्र सरकारकडून सूडाच्या भावनेनं अत्याचार होत असल्याचं म्हटंलय. 



कंगनाने बुधवारी मुंबईत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलं होत. आता कंगनाला हा एकेरी उल्लेख महागात पडणार आहे. याबाबत वकील नितीन माने यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात दाखल अभिनेत्री कंगना राणौतविरोधात तक्रार दाखल केली आहे. नितीन यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंगनाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार नितीश माने यांनी कंगना हिने तिच्या फेसबुक अकाऊंटवरून मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे तुझे क्या लगता है! कि  तुने फिल्म माफिया के साथ मिल के मेरा घर तोडकर बडा बदला लिया है असे शब्द वापरलेला बदनामीकारक व्हिडीओ अपलोड केला म्हणून तक्रार दाखल केली. त्यामुळे, कंगना आणि शिवसेना वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता या वादात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भूमिका घेतली आहे. 



तर दुसरीक़डे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हेंनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.  कंगनाचा बोलविता धनी कोण आहे, याची सुज्ञ जनतेला कल्पना असल्याचं कोल्हे म्हणाले. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. लाखो तरुणांचे रोजगार गेले आहेत. अनेकांच्या हाती नोकऱ्या नाहीत. जीडीपीमध्ये ऐतिहासिक घसरण झाली आहे. एका बाजूला अर्थव्यवस्था संकटात असताना दुसऱ्या बाजूला दर दिवशी कोरोनाचे जवळपास ९० हजार रुग्ण सापडत आहेत. आरोग्य व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच कंगनाला नाहक महत्त्व दिलं जातं असल्याचं कोल्हे म्हणाले.


कंगनाचा शिवसेनेवर पुन्हा निशाणा
ज्या विचारधारेवर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, आज ते सत्तेसाठी ती विचारधारा विकून शिवसेना ते सोनिया सेना बनली आहे, ज्या गुंडांनी माझ्यामागे माझं घर तोडलं त्यांना सिविक बॉडी म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.


मुकेश अंबानींना तगडा भिडू मिळणार; 'जगज्जेता' 20 अब्ज डॉलर गुंतवण्याच्या तयारीत

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

WhatsApp वरील समाजकंटकांपासून कसे वाचाल? जाणून घ्या टिप्स अन् रहा सुरक्षित

Web Title: Loss of Rs two crore; Kangana will take criminal action against BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.