Narayan Rane: नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 06:30 PM2021-09-09T18:30:42+5:302021-09-09T18:46:21+5:30

थकीत कर्जाची परतफेड न केल्याने नारायण राणे कुटुंब अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

Lookout notice issued against Narayan Rane wife Neelam Rane and son Nitesh Rane by Pune Police | Narayan Rane: नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Narayan Rane: नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस जारी

googlenewsNext

पुणे – केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे(Narayan Rane) हे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहेत. राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे राणे कुटुंब पुन्हा चर्चेत आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेनाविरुद्ध राणे कुटुंब असा वाद रंगला आहे. त्यात लुकआऊट नोटीसची भर पडली आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे(Nilam Rane) यांनी DHFL कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ कोटी परतफेड झाली नाही. त्यामुळे DHFL कंपनीने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. राणे कुटुंबाने DHFL कंपनीकडून आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कर्ज घेतलं होतं.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले अशी माहिती त्यांनी दिली तर राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस दिली असेल तर केवळ राजकीय सुडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करतंय. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली तसेच हे राज्य सरकारचं पुढचं पाऊल आहे असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

चिपी विमानतळाच्या उद्धाटनावरुन वादंग

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार असून उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलावलेच पाहिजे असे काही नाही, असे विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्र परिषदेत केले होते. त्यावरून राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वादाला आणखी एक फोडणी मिळाली होती. फडणवीस यांनी ‘केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून काम करायचे असते’ असे विधान करीत ठाकरे यांच्या उद्घाटन समारंभातील उपस्थितीचे एकप्रकारे समर्थनच केले. नागपुरात ते म्हणाले की, चिपी विमानतळ तयार करण्यामध्ये राणे यांचा सहभाग कुणीच नाकारू शकत नाही. मी मुख्यमंत्री असताना ते काम पूर्ण झाले. उद्घाटनही आम्ही केले होते. आता प्रत्यक्ष विमान उडणार आहे. ही श्रेयवादाची लढाई नाही. सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित पत्रपरिषदेत सांगितले, की ९ ऑक्टोबरचा समारंभ मुख्यमंत्री ठाकरे व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. एमआयडीसीने विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. दोन्ही प्रमुख अतिथींच्या स्वागतासाठी मी समारंभाला हजर राहीन असं त्यांनी सांगितले होते.

Web Title: Lookout notice issued against Narayan Rane wife Neelam Rane and son Nitesh Rane by Pune Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.