लोणार विकास व सवर्धनाचे काम सीएमओ अंतर्गत घेणार - उध्दव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 01:40 PM2021-02-05T13:40:00+5:302021-02-05T13:40:49+5:30

Uddhav Thakre at Lonar sarowar मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लोणार सरोवरास भेट दिली.

Lonar development and conservation work will be undertaken by CMO - Uddhav Thackeray | लोणार विकास व सवर्धनाचे काम सीएमओ अंतर्गत घेणार - उध्दव ठाकरे

लोणार विकास व सवर्धनाचे काम सीएमओ अंतर्गत घेणार - उध्दव ठाकरे

Next

बुलडाणा: लोणार सरोवर विकास आराखड्यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करून लोणार सरोवराचे संवर्धन व विकासाचे काम सीएमअेा कार्यालयातंर्गत आपण घेणार आहे. सोबतच लोणार विकास आराड्याचा प्राधान्यक्रम ठरवून टप्प्या टप्प्या टप्प्याने विकासाला प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी लोणारमध्ये स्पष्ट केले.

शुक्रवारी त्यांनी सकाळी लोणार सरोवरास भेट दिली. सरोवराची पाहणी केल्यानंतर, दैत्यसुदन मंदिराची  पाहणी करत एमटीटीसीच्या सभागृहात त्यांनी लोणार सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भाने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा. प्रतापराव जाधव, आ. डाॅ. सजंय रायमुलकर, आ. संजय गायकवाड,  जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार यांच्यासह अन्य उपस्थित होते.

केवळ विकास निधी किंवा प्राधिकरण उभारूण लोणार सरोवर व परिसराचा विकास होणार नाही. त्यामुळे लोणार सरोवर व परिसाराच्या विकास करण्याचे काम आपण सीएमअेा कार्यालयातंर्गत घेणार असल्याचे ते म्हणाले  दरम्यान सिंदखेड राजा विकास आराखडा पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने आपण गंभीर असून लवकरच त्यादृष्टीने महत्त्वपूूर्ण बैठक आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.

या सोबतच लोणार सरोवर विकास आराखड्याच्या  कामाचा नियमित स्वरुपात अहवालही अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे ते म्हणाले.

Web Title: Lonar development and conservation work will be undertaken by CMO - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.