लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 05:46 AM2019-11-05T05:46:26+5:302019-11-05T05:47:17+5:30

ज्वारी, मका व कापसाचे सर्वाधिक नुकसान

On Lokmat Bandh of farmer - Bankruptcy goes bankrupt, how to pay off debt now? farmer asking | लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?

लोकमत बांधावर - दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?

googlenewsNext

राज्यात अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप पिकांची तसेच द्राक्ष, केळी, डाळींब आणि संत्रा बागांची प्रचंड नासाडी झाली. यंदा चांगला पाऊस झाल्याने दिवाळी आनंदात साजरी करता येईल या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले. या नुकसानीमुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू असतानाच महाराष्टÑावर कोसळलेल्या या नैसर्गिक आपत्तीने सगळेच हवालदिल झाले आहेत. राजकीय नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. सरकारने नुकसान भरपाई देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ती मिळेल तेव्हा खरे.

अशा परिस्थितीत ‘लोकमत’चे प्रतिनिधी थेट शेतकºयांच्या बांधावर जावून त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. शेतकºयांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

ज्वारी, मका व कापसाचे सर्वाधिक नुकसान
जळगाव : अवकाळी पावसामुळे खान्देशात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील १६ लाख हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख १९ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रावरील नुकसान झाले आहे.

खान्देशातील शेतकरी हवालदिल : चिखलातून वाट काढत महसूलची पंचनाम्यासाठी कसरत

वर्षभरात शेतात ओतलं अन् अतिवृष्टीने पाण्यात घातलं

एल. डी. वाघमोडे/अंबादास वायदंडे ।

माळशिरस/ सुस्ते : लाखाचे बारा हजार कसे होतात याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना आला आहे. दुष्काळी स्थितीमुळे पाण्याचा थेंब न् थेंब वाचवून पिके घेतली आणि अतिवृष्टीने तिच पिकं पाण्यात घातल्याची स्थिती आता निर्माण झाली आहे. माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील बाजरी आणि कांदा पिके पाण्याखाली आहेत. सडलेल्या पिकांना पाहताना शेतकºयांचा जीव खालीवर होत आहे.
अजनसोंड येथील शेतकरी मारुती बापूराव घाडगे यांनी सात एकरात माडा कांद्याची लागवड केली़ तेव्हापासून आतापर्यंत ४ लाख ५० हजार रुपये खर्चही केला़ परतीच्या पावसाने थैमान घातले आणि होत्याचे नव्हते झाले़ सध्याच्या बाजारभावाप्रमाणे ३० ते ३५ लाख रुपयांच्या कांद्याचे उत्पन्न मिळाले असते,
भांब (ता. माळशिरस ) येथील शेंडगे यांची ४ एकरातील बाजरी काढणीला येताच सुरू झालेल्या पावसात अवघी ६ पोती काळपट रंगाची बाजरी पदरात पडली.

दिवाळीत दिवाळे निघाले, आता कर्ज कसे फेडायचे?
द्राक्ष उत्पादक शेतकºयांचा सवाल
संजय वाघ ।

नाशिक : संपूर्ण कुटुंबाने जीवाचे रान करुन पोटच्या पोरासारख्या जगविलेल्या बागेत निर्यातीसाठी योग्य ठरेल, अशा उच्च प्रतीचा द्राक्षे तयार झालेली होती. त्याची निर्याय करुन कर्जफेडीसह हातात आगामी वर्षासाठी खेळते भांडवल राहील असे स्वप्न पाहत असताना परतीच्या पाऊस काळ बनून आला आणि सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता सरकारने अधिक अंत न पाहता एकरी एक लाख रूपये भरपाई दिल्यास पुढच्या वर्षाची तयारी तरी करता येईल, अशी आपबिती पिंगळवाडे शिवारातील द्राक्ष उत्पादक शेतकरी रवींद्र भामरे कथन करीत होते.
बागलाण तालुक्यातील पिंगळवाडे शिवारात भामरे यांची पावणेचार एकर द्राक्षांची बाग आज मरणासन्न अवस्थेत उभी आहे. बागेतून कुजका वास येत होता. एकरी दोन ते सव्वा दोन लाख रुपये खर्च याप्रमाणे साधारणपणे आठ लाख खर्च करून भामरे यांनी बाग जगविली होती.परतीच्या पावसाने दिवाळे काढले आणि बागेसाठी पाहिलेले स्वप्न अंध:कारमय झाले. वडिलांनी घेतलेले कर्ज माथ्यावर थकीत असताना जिल्हा बॅँकेकडून घेतलेले साडेचार लाख तसेच खासगी सावकारांकडून घेतलेले दोन ते तीन लाखांचे कर्ज कोणाच्या भरवशावर फेडायचे असा उद्विग्न सवाल भामरे यांनी केला.

Web Title: On Lokmat Bandh of farmer - Bankruptcy goes bankrupt, how to pay off debt now? farmer asking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.