मॅच कुणीही जिंको ; मैन ऑफ़ द मॅच मीच आहे : हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 09:44 PM2019-05-23T21:44:36+5:302019-05-23T21:58:05+5:30

मात्र वेळेवर खैरेंच्या विरोधात जाधव उभे राहिल्याने रावसाहेब दानवे यांनी जावाईला मदत केली असल्याचा आरोप खैरी यांनी केला होता.

lok sabha election 2019 Harsh Vardhan Jadhav | मॅच कुणीही जिंको ; मैन ऑफ़ द मॅच मीच आहे : हर्षवर्धन जाधव

मॅच कुणीही जिंको ; मैन ऑफ़ द मॅच मीच आहे : हर्षवर्धन जाधव

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्मा पेक्षा जावाई धर्म पाळला असल्याचा आरोप शिवसनेचे खासदार चंद्रकात खैरेंनी काही दिवसांपूर्वी केला होता. आज लागलेल्या निवडणुकीत त्यांनी केलेला आरोप खरा ठरला असल्याची चर्चा राज्याच्या राजकरणात सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. तर,मॅच कुणीही जिंको ;  मैन ऑफ़ द मॅच मीच आहे . अशी प्रतिक्रिया दानवे यांचे जावाई आणि औरंगाबाद मधून अपक्ष निवडणूक लढवत असलेले हर्षवर्धन जाधव यांनी दिली आहे.


राज्याचे लक्ष लागून असलेल्या औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात युतीकडून चंद्रकात खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र वेळेवर खैरेंच्या विरोधात जाधव उभे राहिल्याने रावसाहेब दानवे यांनी जावाईला मदत केली असल्याचा आरोप खैरी यांनी केला होता. आज आलेल्या निकालात जाधव यांच्यामुळे हिंदू मताचे  विभाजन झाले आणि  खैरे यांच्या पराभव झाला असल्याचे बोलले जात आहे. मॅच कुणीही जिंको ;  मैन ऑफ़ द मॅच मीच आहे  अशी प्रतिक्रिया जाधव यांनी निकालानंतर दिली असून खैरेना सुचूक टोला सुद्धा लगावला आहे.



 

माझ्यामुळे चंद्रकात खैरे यांचा पराभव झाला असल्याचे आरोप खोटे आहेत. हा निकाल जनतेचा आहे त्यामुळे ते मान्य करावेच लागेल. तसेच विधानसभेत सुद्धा मी उभा राहणार असून उमेदवार सुद्धा देणार असल्याचे जाधव म्हणाले.

Web Title: lok sabha election 2019 Harsh Vardhan Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.