लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 09:25 PM2020-05-07T21:25:26+5:302020-05-07T21:26:09+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्सवर कारवाई केली होती.

Lockdown Difference in liquor stocks; BJP MLA's wife's shop license cancelled hrb | लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

लॉकडाऊनमध्ये मद्यसाठ्यात तफावत; भाजपा आमदार पत्नीच्या दुकानाचा परवाना रद्द

Next

जळगाव : लॉकडाऊन काळात मद्याच्या साठ्यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या पोलन पेठेतील नीलम वाईनचा परवाना गुरुवारी रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी ही कारवाई केली असून त्याबाबत दुजोराही दिलेला आहे. दरम्यान, आणखी काही परवाने रद्द होऊ शकतात, असे संकेतही जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या आठवड्यात आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावावर असलेल्या नवी पेठेतील नीलम वाईन्स, मुलगा विशाल सुरेश भोळे यांच्या नावावर असलेले नशिराबाद येथील रामा ट्रेडर्स, त्याशिवाय नोतवाणी यांचे नशिराबादचे विजय सेल्स, गुजराल पेट्रोल पंपाजवळील एन.एन.वाईन्स, बांभोरी येथील विनोद वाईन्स व नंदू आडवाणी यांच्या मालकीचे पाळधी येथील सोनी ट्रेडर्स या सहा दुकानांची तपासणी केली होती. त्यात या सहाही दुकानांमधील मद्यसाठ्यात तफावत आढळून आली होती व रेकॉर्डही अद्ययावत नव्हते. याबाबत अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सर्व दुकानांवर विसंगतीचे गुन्हे नोंदवून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर सचिव अ‍ॅड.कुणाल पवार व युवक अध्यक्ष स्वप्नील नेमाडे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील, आयुक्त कांतीलाल उमाप तसेच विभागीय आयुक्त अ.ना.ओहोळ यांच्याकडे ईमेलद्वारे लेखी तक्रार केली. त्यानंतर या दुकानांची तपासणी झाली होती. 

Web Title: Lockdown Difference in liquor stocks; BJP MLA's wife's shop license cancelled hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.