राज्यातून ग्रीन, ऑरेंज झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये मोठे बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:19 PM2020-05-19T16:19:18+5:302020-05-19T18:42:09+5:30

राज्यातील लॉकडाऊन संदर्भातली नियमावली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविली आहे. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे.

LockDown 4.0: Only red And non red Zone in state; Major changes from May 22nd hrb | राज्यातून ग्रीन, ऑरेंज झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये मोठे बदल

राज्यातून ग्रीन, ऑरेंज झोन हद्दपार; 22 मेपासून लॉकडाऊनमध्ये मोठे बदल

Next

मुंबई : देशभरात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली. केंद्राच्या सुचनेनुसार अनेक राज्यांनी त्यांच्या कक्षेतही काही अधिक प्रमाणात शिथिलता दिली आहे. यावरून केंद्र सरकारने राज्यांना फटकारलेही होते. मात्र, महाराष्ट्राने अद्याप कोणतीही शिथिलता दिली नव्हती. आज लॉकडाऊन ४ बाबत नियम बदलण्यात आले आहेत. 


राज्यातील लॉकडाऊन संदर्भातली नियमावली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठरविली आहे. ही नियमावली येत्या २२ मे पासून लागू होणार आहे. यानुसार महाराष्ट्रात आता दोनच झोन असणार असून ग्रीन आणि ऑरेंज झोन रद्द करण्यात आले आहेत. दोन्ही झोनमध्ये कन्टेनमेंट झोन असणार आहे. राज्यात आता २२ मेपासून रेड आणि नॉनरेड असे दोनच झोन अस्तित्वात असणार आहेत.  आंतरराज्य, आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, मेट्रो सेवा, शिक्षण संस्था, हॉटेल, शॉपिंग मॉल बंद ठेवण्यात येणार आहेत.


तसेच कन्टेन्मेंट सोडून दोन्ही झोनमध्ये मद्य विक्री सुरु राहणार आहे. लग्न, राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच धार्मिक स्थळेही बंद ठेवण्यात येणार आहेत. 


रात्री ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्वांना संचारबंदी लागू असणार आहे. याचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैद्यकीय गरजेशिवाय अन्य गोष्टींसाठी ६५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि गर्भवती महिला, १० वर्षांखालील मुलांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

रेड झोनमध्ये काय काय? 
मुंबई परिसरातील सर्व महापालिका, पुणे महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती रेड झोनमध्ये आहेत. तर राज्यातील उर्वरित भाग हा नॉन रेड झोनमध्ये येणार आहे. कंटेन्मेंट झोनची जबाबदारी स्थानक प्रशासनावर देण्यात आली आहे. पालिका आणि जिल्हा प्रशासनाला यावर निर्णय घ्यायचा आहे. रेड झोनमध्ये रिक्षा, टॅक्सीला परवानगी नाही. चारचाकींना १+२ परवानगी आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. हॉटेलना होम डिलिव्हरीची परवानगी नाही. मालवाहतूक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनने आधी 'मारले', आता औषध देण्याची तयारी; जगाच्या भल्यासाठी घेतले दोन मोठे निर्णय

तुम्ही कोणत्या झोनमध्ये? राज्यात काय सुरु, काय बंद; जाणून घ्या

भाजपा आमदाराने बीडच्या कन्टेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला; गुन्हा दाखल

बापरे! १०८ मेगापिक्सलचा Motorola Edge+ लाँच; लगेचच 15000 चा डिस्काऊंट

मुंबईवर मोठे संकट! १०० हून अधिक कोरोनाग्रस्त बेपत्ता; शोधाशोध सुरु

हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल

CoronaVirus मोठी भीती! ...यामुळे एड्सवर औषध कधीच शोधता आले नाही; कोरोनाबाबतही असेच झाले तर

Web Title: LockDown 4.0: Only red And non red Zone in state; Major changes from May 22nd hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.