इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 16:16 IST2025-12-02T16:14:55+5:302025-12-02T16:16:22+5:30
Santosh bangar Election: मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते.

इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
कळमनुरी येथील एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान गोपनियतेचा भंग झाला आहे. मतदानाचा हक्क बजावत असताना ईव्हीएम मशीनवर मतदान करत असलेल्या महिलेला मतदान कुठे करायचे बांगर यांनी सांगितल्याचा व्हिडीओ समोर येत आहे.
मतदान केंद्रात बांगर मतदानासाठी आले होते. त्यांच्या पुढे दोन महिला होत्या. मतदान केंद्रातच बांगर यांनी फोनवर बोलणे सुरु ठेवले होते. यानंतर पुढे शाई लावत मतदानाची प्रक्रिया पार पाडत असताना पुढे असलेल्या महिलेला ईव्हीएम मशीनवर डोकावून इथे मतदान कर, तिकडचे ते बटन दाब असे हात दाखवत सांगत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून एक तरुण कार्यकर्ता बांगर यांच्या खिशात मोबाईल कॅमेरा सुरु करून ठेवत असल्याचेही यात दिसत आहे.
या प्रकरणी बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदान केंद्र क्रमांक ३ येथे हा प्रकार घडला आहे. यानंतर बांगर यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो आणि एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं च्या घोषणा दिल्या. या सर्वच गोष्टी या गोपनियतेचा भंग करणाऱ्या असल्याने बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.