बीड: राज्यात सध्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडत असताना, पर्यावरण मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांना भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या राजकीय नात्याबद्दल अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली. राजकारणातील त्यांच्या कामाच्या गांभीर्याकडे दुर्लक्ष करून केवळ बहीण-भाऊ म्हणून उल्लेख करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडे यांना पत्रकारांनी विचारले की, या निवडणुकीत 'तुम्हा बहिण-भावाचे पॅनेल' उतरले आहे, त्याबद्दल काय सांगाल? यावर त्यांनी प्रसारमाध्यमांना थेट सूचना केली की, "आम्हाला बहीण-भाऊ म्हणणे बंद करा. आम्ही बहीण-भाऊ आहोत. मात्र, त्याआधी आम्ही गंभीर राजकारणी आहोत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, तर मी भारतीय जनता पक्षाची आहे. आम्ही २०-२२ वर्षे राजकारणात झोकून देऊन काम करत आहोत. आपापल्या पक्षाचे नेते आहोत."
बीड जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांनी भाजप उमेदवारांचा प्रचार केला. तर, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, बीडमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी युती केली. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "आमच्या पक्षांची युती झाली आहे. आम्ही एक पॅनल केले आहे आणि ही युती सर्व ठिकाणी विजयी होईल", असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.
Web Summary : Pankaja Munde urges media to recognize her and Dhananjay Munde as serious politicians, not just siblings from opposing parties. She emphasized their dedication to their respective parties for over two decades. Despite political differences, local alliances exist between BJP and NCP.
Web Summary : पंकजा मुंडे ने मीडिया से आग्रह किया कि उन्हें और धनंजय मुंडे को केवल भाई-बहन नहीं, बल्कि गंभीर राजनेता के रूप में पहचानें। उन्होंने दो दशकों से अधिक समय तक अपने-अपने दलों के प्रति समर्पण पर जोर दिया। राजनीतिक मतभेदों के बावजूद, भाजपा और एनसीपी के बीच स्थानीय गठबंधन मौजूद हैं।