जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ नगरीत उसळला जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 01:40 PM2020-01-12T13:40:25+5:302020-01-12T13:48:06+5:30

फटाक्याची आतीष बाजी व गुलालाची उधळन करुन जिजाऊ भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.

Jijau janmotsav: Jijau Mahapooja on the palace | जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ नगरीत उसळला जनसागर

जिजाऊ जन्मोत्सवासाठी मातृतीर्थ नगरीत उसळला जनसागर

Next

- काशिनाथ मेहेत्रे
सिंदखेड राजा:  जिजाऊ माँ. साहेबांचे जन्मोत्सवा निमित्त  १२ जानेवारी रोजी सुर्योदय समई  मंगलमय वातावरणात सनई चौघड्यांच्या वाद्यात माँ जिजाऊंचे पूजन करण्यात आले. फटाक्याची आतीष बाजी व गुलालाची उधळन करुन जिजाऊ भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. जन्मोत्सवासाठी जनसागर उसळला आहे. 
राष्ट्रमाता जिजाऊ माँ. साहेब क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले दशरात्रौत्सवा निमित्त  ३ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होते. १२ जानेवारीला येथे जिजाऊ भक्तांची मोठी गर्दी झाली होती. राजवाडा रोषणाईने ऊजळुन निघाला. तर राजवाड्यात सडासमार्जन करुन रांगोळी काढण्यात आली. सुर्योदय समई जाधव कुळातील वंशजानी अभिवादन केले.

त्या नंतर महाराष्ट्र  शासनाचे वतीने कॅबीनेट मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खा. प्रतापराव जाधव, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह मान्यवरांनी माँ. साहेबांना अभिवादन केले. त्यानंतर जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवासंघ, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्यावतीने अभिवादन करण्यात आले.  ११ जानेवारी पासूनच महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपºयामधुन जिजाऊ भक्तांचे जथ्थे जिजाऊ शिवरायांच्या  घोषणा देत मातृतिर्थ नगरीत दाखल झाले होते. घोषणांनी जिजाऊ नगरी दुमदुमली होती. जिजाऊ भक्त भगवे फेटे बांधुन हातात भगवा ध्वज घेऊन येत आसल्यामुळे नगरी भगवेमय झाली होती.

Web Title: Jijau janmotsav: Jijau Mahapooja on the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.