ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:06 AM2021-05-09T05:06:31+5:302021-05-09T05:07:22+5:30

त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. तसेच सामान्य नागरिकांना ऑक्सिजनवरचा खर्च परवडणारा नाही.

Jayant Patil demand that GST on oxygen should be abolished by the Center | ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी

ऑक्सिजनवरील जीएसटी केंद्राने हटवावा, जयंत पाटील यांची मागणी

googlenewsNext

मुंबई : ऑक्सिजन आणि ऑक्सिजन्य साहित्यावर जीएसटी लावला जात असून, तो हटवण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.द असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेने अर्थमंत्रालयाकडे पत्रव्यवहार करून जीएसटी कमी करण्याची मागणी केली आहे.  (Jayant Patil demand that GST on oxygen should be abolished by the Center)

त्याच पत्राचा आधार घेत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोरोनाच्या संकटात भारतात औषध आणि आरोग्याशी संबंधित उपकरणांची कमतरता भासत आहे. तसेच सामान्य नागरिकांना ऑक्सिजनवरचा खर्च परवडणारा नाही. अशावेळी ऑक्सिजन आणि ऑक्सिजन्य साहित्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे. हा जीएसटी हटवल्यास राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण थोड्याप्रमाणात कमी होईल आणि कोरोनावर अधिक चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल,  असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
 

Web Title: Jayant Patil demand that GST on oxygen should be abolished by the Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.