आमदार जगतापांच्या उमेदवारीला अंतगर्त गटबाजीचे ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 02:58 PM2019-07-21T14:58:59+5:302019-07-21T15:00:14+5:30

निवडणुकीपूर्वीच जत मतदारसंघात भाजपमध्ये आमदार जगताप यांचा एक गट व जुना भाजप गट अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

Internal Grouping Headache Bjp Mla Vilasrao Jagtap | आमदार जगतापांच्या उमेदवारीला अंतगर्त गटबाजीचे ग्रहण

आमदार जगतापांच्या उमेदवारीला अंतगर्त गटबाजीचे ग्रहण

googlenewsNext

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच अपेक्षेप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजप पक्षाला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. भाजपचे विद्यमान आमदार विलासराव जगताप यांच्या उमेदवारीला पक्षातून विरोध होत असल्याने, पक्षातील गटबाजीने जगताप यांची डोकेदुखी वाढली आहे.

जत मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत जगताप यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवत विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपमध्ये जगताप यांचा आणि जुने भाजपनेत्यांचा असे दोन गट निर्माण झाले होते. पुढे हे गट कायम राहिले. आता विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही गट एकमेकांविरोधात सक्रीय झाले असल्याचे पहायला मिळत आहे.

आमदार जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, जगताप यांच्या जागी नवीन उमदेवार द्यावा अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून होत आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच जत मतदारसंघात भाजपमध्ये आमदार जगताप यांचा एक गट व जुना भाजप गट अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.

जगताप यांना विरोध होत असला तरीही, जगताप यांनी पक्षातील आपली पकड मजबूत करून ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, अजितराव घोरपडे यांच्यातील वाद मिटविण्यात जगताप यांच्या मोठा वाटा होता. तर जत तालुक्यातून लोकसभेत भाजपला २५ हजाराचे मताधिक्या सुद्धा मिळवून देण्याचे काम जगताप यांनी केले होते. त्यामुळे भाजपकडून त्यांचे नाव निश्चित समजले जात आहे. मात्र उमदेवारी मिळून ही पक्षातील विरोधकांची नाराजी दूर करणे जगताप यांच्यासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Web Title: Internal Grouping Headache Bjp Mla Vilasrao Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.