इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:22 IST2025-12-07T13:19:47+5:302025-12-07T13:22:54+5:30
Indigo Flight Crisis: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.

इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
इंडिगो विमान सेवेचा फटका आता राज्यातील अनेक आमदारांना पण बसलेला पाहायला मिळत आहे. सोमवारपासून नागपूर आत राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून राज्यभरातील सर्वपक्षीय आमदारांना आज नागपूरला पोहोचायचं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून इंडिगो या विमान कंपनीचा झालेला गोंधळ आणि इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने आता अनेक आमदारांची तिकिटं रद्द झालेली पाहायला मिळत आहेत.
त्यातच पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या आमदारांना नागपूरला पोहोचायचं आहे त्या आमदारांनी आता थेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चार्टर्ड विमानाने जाण्याचा निर्णय घेतला आहे.. चंद्रकांत पाटील आज दुपारी चार्ट विमानाने पुण्याहून नागपूरला रवाना होणार आहेत तर आम्ही देखील अनेक आमदार दादांसोबत जाणार असल्याचं पुण्याच्या शिवाजीनगर मतदारसघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितल आहे.