महत्वाची बातमी : जेजुरीची सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द; 'या' काळात प्रवेश राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:53 PM2020-12-12T17:53:59+5:302020-12-12T17:59:55+5:30

भाविकांनी जेजुरीत येणे टाळावे - पोलीस प्रशासनाचे आवाहन

Important News: Jejuri's Somvati Yatra and Palkhi ceremony canceled; Access will be closed during this period | महत्वाची बातमी : जेजुरीची सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द; 'या' काळात प्रवेश राहणार बंद

महत्वाची बातमी : जेजुरीची सोमवती यात्रा व पालखी सोहळा रद्द; 'या' काळात प्रवेश राहणार बंद

googlenewsNext
ठळक मुद्दे१२ ते १४ डिसेंबरपर्यंत जेजुरीत भाविकांना प्रवेश बंद राहणार रूढी ,परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी

जेजुरी : सध्या कोरोना महामारीच्या उत्तरार्धात आपण आहोत. शासनाने जरी मंदिरे सुरू केली तरी त्यासाठी नियम अटी ,शर्ती व कायदा केला आहे. .भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील आदेशानुसार कलम १४४ नुसार जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. यामुळेच येत्या सोमवारी आलेली सोमवती अमावास्या यात्रा आणि पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे .

जेजुरीत १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत भाविकांना प्रवेश बंद राहणार आहे .त्यामुळे राज्याच्या विविध भागातील भाविक भक्तांनी देवदर्शनासाठी जेजुरीत येऊ नये ,प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.

येत्या सोमवारी (दि.१४) सोमवती अमावस्या असल्याने या पार्श्वभूमीवर पेशवे लॉज येथे ग्रामस्थ खांदेकरी ,मानकरी ,पुजारी ,सेवेकरी ,देवसंस्थान विश्वस्त मंडळ ,,नगरपालिका प्रशासन यांची संयुक्तिक बैठक घेण्यात आली . बैठकीत येत्या सोमवारी येणाऱ्या भर सोमवती अमावस्या यात्रा आणि मंगळवार पासून  सुरू होणारा सहा दिवसांचा चंपाषष्टि उत्सव याबाबत चर्चा झाली. चर्चेत सोमवती यात्रा रद्द करण्याचा तर चंपाषष्टी षढरास्त्रोत्सव ही साधेपणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

 यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे ,सचिन पेशवे ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे ,सचिव छबन कुदळे ,उपाध्यक्ष आबा राऊत ,विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई ,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे ,माजी प्रमुख विश्वस्त सुधीर गोडसे ,विश्वस्त शिवराज झगडे ,दिलीप आगलावे ,मानकरी ,सेवेकरी ,पुजारी उपस्थित होते ,प्रशासनाच्या आदेश ,सूचनांचे पालन करण्यात येईल.

रूढी ,परंपरेनुसार श्रींचे सर्व धार्मिक विधी करण्यात येतील. मात्र पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार १२ते १४ डिसेंबरच्या काळात जेजुरीत येणे टाळावे, असे इनामदार पेशवे यांनी आवाहन केले आहे.

Web Title: Important News: Jejuri's Somvati Yatra and Palkhi ceremony canceled; Access will be closed during this period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.