‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 22:46 IST2025-12-02T22:46:29+5:302025-12-02T22:46:49+5:30
Cold Wave In Maharashtra News: दितवा चक्रीवादळ आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो, असे म्हटले जात आहे.

‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
Cold Wave In Maharashtra News: दितवा चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये दिसत आहे. दितवा चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कराईकल आणि तेलंगणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकात सोसाट्याचे वारे वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतु, अनेक भागात तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत असून, थंडीत वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील काही दिवस कायम राहू शकतो. यामुळे राज्यातील काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत मागच्या काही वर्षातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईतही गारठा कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
यंदाच्या हिवाळ्यात डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या भागात तीव्र थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात याचा सर्वाधिक परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठावाडा या भागावर होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब भागात सामान्यतः ४ ते ६ दिवस थंडीची लाट असते मात्र यावर्षी थंडीच्या लाटेचा परिणाम हा दहा दिवसांपर्यंत जाणवू शकतो. तर, देशाच्या उर्वरित भागांत किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहू शकते. तर मणिपूर आणि ओडिशामध्ये दाट धुके पसरू शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.