'तुमचे अश्रू खरे असतील तर महाराष्ट्राची माफी मागा', राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 12:54 PM2019-10-12T12:54:51+5:302019-10-12T12:55:16+5:30

मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला आहे.

If your tears are true then apologize to Maharashtra, Sanjay Raut's answer to Ajit Pawar | 'तुमचे अश्रू खरे असतील तर महाराष्ट्राची माफी मागा', राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

'तुमचे अश्रू खरे असतील तर महाराष्ट्राची माफी मागा', राऊतांचा अजित पवारांवर पलटवार

Next

मुंबई - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. तसेच, बाळासाहेबांच्या अटकेवरुनही राऊत यांनी अजित पवारांवर टीकेचे बाण सोडले. बाळासाहेबांना अटक हा कुणाचा तरी फाजील हट्ट होता. बाळासाहेबांना अटक ही चुक होती... वगैरे वगैरे... हे कळायला इतकी वर्ष लागली का, असा प्रश्न विचारत ही चूक नसून हट्टापायी घेतलेला निर्णय असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बाळासाहेबांना त्याकाळी अटक करण्यात आलेल्या कृत्यावर मोठा खुलासा केला आहे. वरिष्ठांच्या हट्टापायी बाळासाहेबांना अटक करण्यात आली. बाळासाहेबांना अटक ही राष्ट्रवादीची चूक होती. त्या काळामध्ये आमचंही स्वतःचं मत होतं. इतक्या टोकाचं राजकारण कोणी करू नये, त्यावेळी आमच्या मताला एवढी किंमत नव्हती. काही जणांच्या हट्टापायी तसं करण्यात आलं, असे अजित पवारांनी सांगितले.

वास्तविक तसं कोणाच्याच बाबतीत करू नये, आम्ही त्यावेळी संबंधित व्यक्तीला विचारलं की असं का करताय, तेव्हा ते म्हणाले, आम्ही विभागाचे प्रमुख आहोत, आम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय घेणार आहोत. अजित पवारांनी बाळासाहेबांना अटक केलेल्या मुद्द्यावर मोठा खुलासा केला आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावरुन संजय राऊत यांनी अजित पवारांनाच माफी मागण्याची सूचना केली आहे. अजित दादा तुमचे अश्रू खरे असतील तर त्या अटकेबद्दल माफी मागा, असे आवाहनच संजय राऊत यांनी केले आहे. 


 

Web Title: If your tears are true then apologize to Maharashtra, Sanjay Raut's answer to Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.