नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:44 AM2019-09-19T11:44:33+5:302019-09-19T11:51:37+5:30

अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते.मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही.

If the objection is found in the presentation of the drama , the play will be cancelled: Arun Nalavade | नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे 

नाटकांच्या सादरीकरणात आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द होणार : अरूण नलावडे 

googlenewsNext
ठळक मुद्देसंहितांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यता मंडळाने धोरण लवचिक केले तरीही नियम मोडले जात असल्याचे निदर्शनास कायमस्वरुपीचे प्रमाणपत्र घेण्यास कलाकारांना अवधी मिळत असल्याने त्यांची सोय

पुणे : नाटकातील संवादामध्ये बदल आणि अंगविक्षेपांवरील आक्षेप अशा स्वरूपाच्या काही नाटकांच्या तक्रारींमुळे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने (नाट्यसेन्सॉर बोड) यापुढील काळात नाटकाच्या सादरीकरणामध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास नाटकाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सादरीकरणात काही आक्षेपार्ह आढळले किंवा काही तक्रार आली तर मान्यता रद्द होऊ शकते, अशी तळटीप संहितेला मान्यता देणा पत्रामध्ये यापुढे खास लिहिली जाणार आहे.  
    नाटक हे समाजामध्ये प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. रंगभूमीवर कोणतीही कला सादर करण्यापूर्वी मंडळाकडून संहिता मान्य करून घेणे बंधनकारक आहे. अनेकदा उद्या प्रयोग असताना ऐनवेळी संहिता मान्यतेसाठी पाठवली जाते.मात्र, संहितेनुसार प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग सादर होतोच असे नाही. संवादामध्ये होणारे बदल आणि अंगविक्षेपकांना घेतले जाणारे आक्षेप यामुळे समाजात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यास मान्यता दिल्यानंतर प्रत्यक्षात सादरीकरण वेगळेच असल्याचे प्रकार घडले आहेत. मंडळाने धोरण लवचिक केले तरीही नियम मोडले जात असल्याचे दिसून आले आहे. मंडळाने घालून दिलेल्या नियमावलीचा भंग होत असेल आणि समाजामध्ये अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असेल तर अशा नाटकांविरुद्ध मंडळाला कारवाई करावीच लागेल, याकडे नलावडे यांनी लक्ष वेधले. कोणत्याही सादरीकरणास अटींवर मान्यता देण्यात येते. त्यामुळे नियम न पाळणा-यांच्या संहितांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय मंडळ घेऊ शकते, असे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी बुधवारी पत्रकारांना सांगितले.
संहितांना शक्यतो मान्यता देण्याचे धोरण आहे. लेखकाने संहितेवर कष्ट घेतलेले असतात. कात्री लावणे योग्य नाही, हे आम्हाला कळते; पण आवश्यकतेनुसार नको तो भाग काढावा लागतो. यापुढे संहितेला मान्यता दिल्यानंतर मंडळाचे सदस्य किमान पाच प्रयोग पाहतील, असे नलावडे यांनी स्पष्ट केले.
------------
संहितांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यता
ग्रामीण भागातल्या लेखक-कलाकारांना संहितेच्या मान्यतेसाठी मुंबईतील कार्यालय गाठणे शक्य नसल्याने व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तात्पुरती मान्यता देण्यात येत आहे. मंडळाने प्रत्येक जिल्ह्यात प्रतिनिधी नेमले असून त्यांच्याकडे संहिता सादर करता येईल. सदस्याने ती वाचून मंडळाला अभिप्राय कळवल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मान्यतेचे पत्र देण्यात येईल. कायमस्वरुपीचे प्रमाणपत्र घेण्यास कलाकारांना अवधी मिळत असल्याने त्यांची सोय झाली आहे, असे अरुण नलावडे यांनी सांगितले. 
-----------------------
जुन्या संहितांचे जतन
मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाकडे १९५४ पासूनच्या ७० हजार नाटकांच्या संहिता आहे. त्यापैकी काही संहितांना वाळवी लागली आहे. पण, या दजेर्दार नाटकाचा भावी पिढ्यांना अभ्यास करता यावा या उद्देशातून संहितांचे स्कॅनिंग करून जतन करण्यात येत असल्याचे अरुण नलावडे यांनी सांगितले. मात्र, काही संहितांचे हक्क लेखकांच्या वारसदारांकडे असल्याने त्या विनापरवानगी प्रयोग करण्यासाठी उपलब्ध होतील, याची खात्री देता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: If the objection is found in the presentation of the drama , the play will be cancelled: Arun Nalavade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.