लक्ष्मी आली तर येऊ द्या, नाही म्हणू नका - यशोमती ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:38 AM2020-01-06T05:38:42+5:302020-01-06T05:38:57+5:30

राजकारणामध्ये रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे.

If Lakshmi comes, don't say no, say no - Yashomati Thakur | लक्ष्मी आली तर येऊ द्या, नाही म्हणू नका - यशोमती ठाकूर

लक्ष्मी आली तर येऊ द्या, नाही म्हणू नका - यशोमती ठाकूर

googlenewsNext

अकोला : राजकारणामध्ये रात्रीतून गेम बदलतात आणि रात्रीतून गेम बदलल्यानंतर काय काय होते, हे माझ्यापेक्षा तुम्हा लोकांना माहीत आहे. जे आपल्याविरोधात आहेत, त्यांचे खिसे भरलेले आहेत. त्यांचे खिसे खाली करण्यासाठी ते येत असतात. आपले काही सरकार नव्हते आणि आता फक्त शपथच घेतलेली आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे विधान माहिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. कारंजा येथे शनिवारी त्यांनी उपरोेक्त वादग्रस्त वक्तव्य केल्यावर अकोल्यात बोलताना, आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका, लक्ष्मी येत असेल तर येऊ द्या, असे प्रचारसभेत सांगितले.
वाशिममधील कामरगाव येथे सभेत ठाकूर म्हणाल्या, आपले खिसे अजून गरम व्हायचे आहेत, विरोधकांचे खिसे मात्र ‘बंबाट’च भरलेली आहेत. ते खाली करण्यासाठी तुमच्याकडे ते आले तर घ्या. या विधानाच्या पुष्टीसाठी आपले सरकार आता आले आहे. अजून खिसे गरम व्हायचे आहेत, असे त्या म्हणाल्या.
अकोल्यातील पातूर तालुक्याच्या आलेगाव येथे सभेत त्या म्हणाल्या, संध्याकाळी आलेल्या लक्ष्मीला परत पाठवू नका; मात्र मतदान आम्हालाच करा.
>माझा तसा कुठलाही हेतू नव्हता. भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लक्ष्मीला नाकारू नका, असे वक्तव्य केले होते. मी केवळ त्याची आठवण करून दिली. त्यांचेच ते वाक्य होते. आता मात्र विरोधकांनी त्याच वाक्यावरून ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
- यशोमती ठाकूर, महिला व बालकल्याण मंत्री
>डल्ला मारण्यासाठी सत्तेत- फडणवीस
महाविकास आघाडीचे सरकार हे जनसेवेसाठी नाही तर डल्ला मारण्यासाठी सत्तेवर आले आहे. आम्ही नुकतीच शपथ घेतली, अजून आमचे खिसे गरम व्हायचे आहेत, असे स्वत: मंत्री जाहीर सभांमधून सांगत आहेत. जे मनात होतं, तेच आता शब्दांमधून बाहेर पडू लागले आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील खैरगाव, येनवा, बडेगाव, कांद्री मनसर, निमखेडा, सिर्सी, बेसा आणि येरखेडा येथे सभा घेतल्या.

Web Title: If Lakshmi comes, don't say no, say no - Yashomati Thakur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.