बिरोबाची शपथ हाय! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर...; काय म्हणाले होते गोपीचंद?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 02:44 PM2019-09-30T14:44:52+5:302019-09-30T14:45:56+5:30

सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती

If Dhangar didn't get reservation...; What was said by Gopichand Padalkar? Video Viral on social media | बिरोबाची शपथ हाय! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर...; काय म्हणाले होते गोपीचंद?

बिरोबाची शपथ हाय! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर...; काय म्हणाले होते गोपीचंद?

googlenewsNext

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर नेते गोपीचंद पडळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याविरोधात गोपीचंद पडळकर यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर विरुद्ध अजित पवार असा सामना बारामतीच्या आखाड्यात पाहायला मिळणार आहे. 

सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. 3 लाखांहून अधिक मतदान गोपीचंद पडळकरांना पडल्यामुळे सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. प्रसिद्ध वक्ता म्हणून धनगर समाजात लोकप्रिय असलेले गोपीचंद पडळकर यांना भाजपात घेऊन बारामतीत धनगर समाजाला आकर्षिक करण्याचा प्रयत्न भाजपाकडून झाला आहे. 
राजकारणाच्या सुरुवातील महादेव जानकरांच्या रासपामध्ये, 2014 ची निवडणूक भाजपाकडून, 2019 लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून आणि आता पुन्हा 2019 विधानसभा निवडणूक भाजपाकडून असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. भाजपात प्रवेश केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी गोपीचंद पडळकर हे भाजपातून बाहेर पडत राज्यभर धनगर समाजाचे मेळावे घेत होते. त्यातील एक व्हिडीओ व्हायरल करून गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करण्याचं काम सुरु आहे. 

या व्हिडीओत गोपीचंद पडळकर म्हणतात की, भारतीय जनता पार्टीने धनगरांना आरक्षण दिलं नाही तर माझ्या घरातलं कोणी उभं राहिलं, माझी आई उभी राहिली तरी मतदान द्यायचं नाही, मी उभा राहिलो तरी मतदान द्यायचं नाही, माझा उभा राहिला तर मतदान द्यायचं नाही, बिरोबाची शपथ हाय अशा शब्दात उपस्थित लोकांना आश्वासन देतात.

मात्र त्यांचा हाच व्हिडीओ निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल झाल्याने गोपीचंद पडळकर यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक पुढे सरसावणार आहेत. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांपैकी गोपीचंद पडळकर हे एकटेच नाही तर अन्य नेत्यांचेही जुने व्हिडीओ व्हायरल होत असल्याने विरोधकांच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे.  

Web Title: If Dhangar didn't get reservation...; What was said by Gopichand Padalkar? Video Viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.