“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 20:07 IST2025-12-09T20:07:12+5:302025-12-09T20:07:17+5:30
BJP Kirit Somaiya News: २०१९ मध्ये घडलेली ती घटना विसरू शकत नाही, असे सांगत किरीट सोमय्या यांनी मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली.

“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
BJP Kirit Somaiya News: मुंबईला बांगलादेशीमुक्त करण्यासाठी हा भाजपचा कार्यकर्ता पुढे येत आहे. बांगलादेशी लोक मला घाबरत आहेत, हे माझ्यासाठी मोठे पद आहे, असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी स्पष्ट केले. बनावट जन्म प्रमाणपत्र दाखलेसंदर्भात किरीट सोमय्या यांनी तहसीलदारांची भेट घेतली. यानंतर मीडियाशी बोलताना २०१९ मध्ये झालेला अपमान, उद्धव ठाकरेंच्या हट्टावरून एका भाजपा नेत्याने पक्षाच्या कार्यालयातून बाहेर काढणे आणि त्यावरून असलेली नाराजी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली.
देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, २०१९ची घटना मी विसरू शकत नाही. पक्षासाठी मी त्याग, बलिदान दिले आहे. मला कोणत्याही पदाची गरज नाही. मी पक्षासाठी काम करत आहे. मी सर्वांपेक्षा जास्त हजारो पटीने मी काम करत आहे. कार्यकर्ता माझ्यासोबत आहे, हे माझ्यासाठी सर्वांत मोठे पद आहे. मी नाराज नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे ‘त्या’ भाजपा नेत्याने कार्यालयातून बाहेर काढले
भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी समझोता केला हे ठीक आहे. असे असले तरी मुद्दा असा आहे की, मला प्लॅटफॉर्मवरुन बाहेर काढले. पार्टीच्या सभागृहातून बाहेर काढले. हे केवळ उद्धव ठाकरेच्या हट्टामुळे झाले. मी कधीही त्या भाजप नेत्याला माफ करू शकत नाही, असे म्हणत किरीट सोमय्या यांनी मनातील खंत जाहीरपणे बोलून दाखवली.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी काळजी घेत असतात, देशाच्या गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली आहे, यापेक्षा महत्वाचे काय आहे. भाजपाच्या निवडणूक संचालक पदासाठी अमित साटम का हट्ट करत आहेत हे मला माहिती नाही, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.