गरज पडल्यास गृहनिर्माण विभागातर्फे १४ हजार घरे कोरोना रुग्णांसाठी वापरणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 05:58 PM2020-04-06T17:58:33+5:302020-04-06T18:00:36+5:30

कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्याबरोबर त्यांची योग्य ती काळजी घेण्यासाठी आता गृहनिर्माण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार या खात्याच्या अखत्यारीत असलेली १४ हजार घरे कोरोनासाठी उपलब्ध करुन देण्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी केली.

Home Minister Jitendra Awhad decides to use 3,000 houses for Corona patients if needed | गरज पडल्यास गृहनिर्माण विभागातर्फे १४ हजार घरे कोरोना रुग्णांसाठी वापरणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

गरज पडल्यास गृहनिर्माण विभागातर्फे १४ हजार घरे कोरोना रुग्णांसाठी वापरणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

Next

ठाणे : कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रूग्णांना आयसोलेट (विलगीकरण) आणि क्वारंटाईन करण्यासाठी गृहनिर्माण खात्याच्या ताब्यात असलेली सुमारे १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा आव्हाड यांनी केली. रूग्णांना आयसोलेट आणि क्वारंटाईन करण्यासाठी या घरांची मोठी मदत होणार आहे.
                   महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य खात्याने चोख कामिगरी बजावत अनेक ठिकाणी कोरोनावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची व्यवस्था केली आहे. कोरोनाविरोधातील या लढ्यात आता गृहनिर्माण खातेही ताकदीने उतरले आहे. देशातील सगळ्यात मोठा आयसोलेशन आणि क्वारंटाईन झोन महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याने उभा करण्याची तयारी केली आहे.रूग्णांना आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्यासाठी ही घरे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
                    सोमवारी त्यांनी सोशल डिस्टन्सींग ठेवत गृहनिर्माण खात्याच्या अधिकात्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अधिकारी अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राधाकृष्ण हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये आव्हाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत गृहनिर्माण खाते काय काम करू शकते, याचा आढावा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाड यांनी कोरोना रूग्णांना आरसोलेट तसेच क्वारंटाईन करण्यासाठी तत्काळ १४ हजार घरे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, जर रु ग्णालयांची कमतरता भासत असेल तर गृहनिर्माण विभागाने मुंबईकरांच्या आण िमहाराष्ट्राच्या हितासाठी या घरांची तयारी ठेवली आहे.या घरांचा रूग्ण क्वारंटाईन करण्यासाठी वापर करता येऊ शकेल. अगदीच वेळ हाताच्या बाहेर जायला आली तर अजून ह्यामध्ये १० हजार घरांची व्यवस्थाही करु शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: Home Minister Jitendra Awhad decides to use 3,000 houses for Corona patients if needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.