औषधांअभावी एचआयव्ही रुग्णांचा जीव धोक्यात! ई- टेंडरिंगमध्ये रखडली औषध खरेदी प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:15 AM2020-01-13T03:15:38+5:302020-01-13T03:15:47+5:30

थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीचे सहा केंद्रे

HIV patients endangered by drugs! E-tendering | औषधांअभावी एचआयव्ही रुग्णांचा जीव धोक्यात! ई- टेंडरिंगमध्ये रखडली औषध खरेदी प्रक्रिया

औषधांअभावी एचआयव्ही रुग्णांचा जीव धोक्यात! ई- टेंडरिंगमध्ये रखडली औषध खरेदी प्रक्रिया

Next

प्रवीण खेते

अकोला : देशभरात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा असून, त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील रुग्णांना बसत आहे. राज्यात थर्ड लाईन औषधांसाठी एआरटीची केवळ सहा केंद्रे असून, येथे रुग्णांना सात ते आठ गोळ््याच दिल्या जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनाईझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हास्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत. मात्र, ई-टेंडरींगची प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे दीड महिन्यांपासून राज्यात एचआयव्हीच्या थर्ड लाईन औषधांचा तुटवडा आहे.

एचआयव्ही रुग्णांसाठी राज्यभरात ‘अ‍ॅन्टी रिट्रोव्हायरल थेरपी’ (एआरटी) केंद्र सेवा देत आहेत. या ठिकाणी एचआयव्हीच्या रुग्णांना गरजेनुसार फस्ट , सेकंड आणि थर्ड लाईन औषधे दिली जातात. परंतु, वर्षभरापासून औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना दोन महिन्यांऐवजी केवळ दहा ते पंधरा दिवसांची औषधे दिली जात आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनच्या (नॅको) निर्देशानुसार, एआरटी केंद्रांना स्थानिक स्तरावरच औषध खरेदीबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, अकोला येथील एआरटी केंद्रांवरच थर्ड लाईन औषधांचा पुरवठा केला जातो. मात्र, येथील औषध साठा दीड महिना पुरेल एवढाच असल्याची माहिती संंबधित अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

एकाचा झाला मृत्यू
औषधांअभावी तमिळनाडूतील तंबरम (जिल्हा कद्दुलोर) येथील एका रुग्णाचा शनिवारी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती अकोल्यातील विहान संस्थेतर्फे देण्यात आली आहे.

Web Title: HIV patients endangered by drugs! E-tendering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :HIV-AIDSएड्स