मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 07:00 AM2019-08-04T07:00:00+5:302019-08-04T07:00:15+5:30

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय...

"History Expeditions" that mark of history through bond of friendship | मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

मैत्रीच्या बंधातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपणारे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स'' 

Next

- दीपक कुलकर्णी-  

पुणे: ज्या व्यक्तीसोबत सहज व्यक्त होता येते ती मैत्री. कधी कधी एकाच ध्येयाने प्रेरित होवून एक एक मित्रांची सुंदर शृंखला होत मैत्रीचे बंध फुलवणारा ग्रुप जमतो. ज्यात वाद विवाद होतात पण संवाद जपला जातो. कुणी धडपडतो ,कुणी चुकतो तसा त्यांना रागावले जाते तसा हक्काचा मदतीचा हातही दिला जातो. कसलेही आढेवेढे न घेता इतिहासाचे वेड, आणि महाराजांच्या चरणी समर्पित भावनेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेला एक ग्रुप जो मैत्रीच्या ऋणानुबंधनातून इतिहासाच्या पाऊलखुणा जपतोय..त्या ग्रुपचं नाव आहे '' हिस्टरी एक्सपेडिशन्स.. '' 
      छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे यावर काम करणारा हा ग्रुप. गेल्या ९ वर्षांपासून हा ग्रुप कार्यरत आहे.या ग्रुपचे वैशिष्टये म्हणजे इथे आवडीप्रमाणे कामाची संधी उपलब्ध करुन दिले जाते. विविध क्षेत्रातील सहभागी लोकांची आवड,  कौशल्याला परिपूर्णतेची जोड देत इतिहासाची जपणूक करताना सामाजिक कार्यातलं योगदान दिल्याचे समाधान या ग्रुपमधून मिळते. यात फोटोग्राफी, चित्रकला, मोडी भाषा प्रेम, संशोधन, व्याख्याने, या छंदाप्रमाणे काम करण्याची संधी दिली जाते. 
देशभरातील गड, भुईकोट, सागरी किल्ल्यांना प्रत्यक्ष भेटी, त्यांचा आर्किटेक्चर नजरेतून अभ्यास, कागदपत्रांची जमवाजमव, प्राचीन दगडी मंदिरे,  संशोधन,जुन्या वस्तूंचा संग्रह अशा विविध अंगानी इतिहासाच्या प्रांतांत हा हिस्टरी एक्सपेडिशन्स हा ग्रुप मस्तपैकी मुशाफिरी करतो आहे. तसेच या ग्रुपच्या माध्यमातून इतिहासाप्रति आस्था, प्रेम निर्माण व्हावे, आणि अभूतपूर्व पराक्रमाचे बाळकडू मिळावं या अनुषंगानेच केलेल्या ३५० किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत.विविध शाळांमध्ये शिवनेरी ते रायगड या स्लाईड शोचे असंख्य प्रयोग यांनी विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविण्याचा एक प्रयत्न केला जातो. यातून स्टडी टूर्स, गडकिल्ल्यांवरील स्वच्छता, वृक्षसंवर्धन, वीर गळींचा अभ्यास , ऐतिहासिक दस्तऐवजांचे जतन यासाठी प्रयत्न आणि आर्थिक यासाठी प्रत्येकजण कुटुंब, व्यवसाय सांभाळत सर्वतोपरी योगदान देत इतिहासावरचे जीवापाड प्रेम जपतो.  
      प्रसाद तारे यांच्या अधिपत्त्याखाली हा ग्रुप कार्यरत आहेत. या ग्रुपमध्ये अनिकेत डुंबरे, संतोष तांदळे, ऋषिकेश अंतरकर, बिपीन भोंग, सुदर्शन तौर, अतुल जोशी,  गिरीश दिवटे, अमोल पोखरकर, अमित दारुणकर, व्यास वरे यांसारख्या जवळपास महाराष्ट्रभर ३०० ते ३५० इतिहासप्रेमी या ग्रुपशी जोडले गेले आहे.  व्हाट्स अप , फेसबुक यांसारख्या सोशल मीडियावर हा देखील इतिहासातील अनेक गोष्टींची माहिती आपल्याला मिळत राहते. 


हिस्टरी एक्सपेडिशन्स ग्रुपचे प्रसाद तारे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र, गडकिल्ले आणि प्राचीन मंदिरे यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. या इतिहासाठून आपल्या आयुष्यात उद्भवलेल्या कठीण प्रसंगातून सावरण्याची जिद्द , प्रेरणा मिळते.  इतिहासाचे ही अंगे माणसाला समाधान देऊन जातात. 

Web Title: "History Expeditions" that mark of history through bond of friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.