Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 09:22 AM2020-02-10T09:22:07+5:302020-02-10T09:27:43+5:30

Hinganghat Burn Case : पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली.

hinganghat burnt case The body will not accept until justice is obtained says the victim's family | Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा

Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा

googlenewsNext
ठळक मुद्दे हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे.'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा.'आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही' असं नातेवाईकांनी म्हटलं आहे.

हिंगणघाट (वर्धा)/ नागपूर -  हिंगणघाट प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. सोमवारी (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने शेवटचा श्वास घेतला. पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही' असा पवित्रा पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी घेतला आहे. 

'आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही' असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. तसेच 'मुलाला आमच्या स्वाधीन केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही. त्याला देखील जिवंत जाळा. त्याला जिवंत जाळल्याशिवाय मुलीच्या आत्माला शांती मिळणार नाही' अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. तसेच 'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा' असं म्हणत पीडित तरुणीच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच मुलीला त्वरीत न्याय मिळाला पाहिजे अशा भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. 

'जो त्रास माझ्या मुलीला झाला तोच त्रास त्याला देखील झाला पाहिजे. मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा. त्याला देखील जिवंत जाळा. निर्भयाच्या मारेकऱ्यांसारखं नको, लवकरात लवकर आरोपीला शिक्षा व्हावी' असं पीडित तरुणीच्या वडिलांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला त्यांनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला पेट्रोल टाकून जाळा अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. 'मुलीची अवस्था बघवत नाही. ती हातवारे करून बोलण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्यालाही जिवंत जाळा. मुलालाही त्याच वेदना झाल्या पाहिजेत' असं पीडित तरुणीच्या आईने देखील म्हटलं होतं.

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.


 

महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप

हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

Oscar 2020 LIVE: ब्रॅड पिट ठरला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे बळी ८१३ वर

 

Web Title: hinganghat burnt case The body will not accept until justice is obtained says the victim's family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.