जायकवाडी हाय अलर्टवर! पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:16 PM2019-08-25T12:16:47+5:302019-08-25T12:59:03+5:30

धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

High Alert issued at jaikwadi Dam | जायकवाडी हाय अलर्टवर! पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

जायकवाडी हाय अलर्टवर! पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

googlenewsNext

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण असलेल्या जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत अचानक वाढ करण्यात आली आहे. तर गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धरणावरील पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आला असून, या सर्व घडामोडीमुळे खळबळ उडाली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण नुकतेच ९० टक्के भरले आहे. त्यानंतर जायकवाडी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. मात्र आता पर्यटकांना धरणाच्या भिंतींवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तर परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पूर्वी चार पोलीस कर्मचारी धरणावर नेमण्यात आले होते. आता जायकवाडी धरणावर १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलसंपदा विभागानेही खासगी सुरक्षा गार्ड वाढवून सर्व बाजूच्या चौक्यावर २४ तासांचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती धरणावर नियुक्ती असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर देशातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी आता खासगी व्यक्तींना धरणावर जाण्यास बंदी केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांनासुद्धा गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आधीसुद्धा जायकवाडी धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एटीएसकडून जलसंपदा विभागाला पत्र देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: High Alert issued at jaikwadi Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.