UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं

By Appasaheb.patil | Published: October 26, 2019 03:55 PM2019-10-26T15:55:16+5:302019-10-26T21:59:53+5:30

पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश; आयोगाकडून नुकताच निकाल जाहीर

Harshal Bhosale is the first to appear in the IES exam | UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं

UPSC परीक्षेत सोलापूरचा पठ्ठ्या देशात पहिला, हर्षल भोसलेनं करुन दाखवलं

googlenewsNext
ठळक मुद्दे- हर्षल भोसले हा तांडोर (ता़ मंगळेवढा) येथील रहिवासी- आईएसच्या मुलाखती सप्टेंबर महिन्यात झाल्या होत्या- हर्षलच्या यशाने तांडोर निवासस्थानी शुभेच्छांसाठी ग्रामस्थांसह नातेवाईकांची गर्दी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत तांडोर (ता. मंगळवेढा) येथील हर्षल ज्ञानेश्वर भोसले याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हर्षल पाच वर्षांचा असताना त्याचे वडील वारले. त्यानंतर आईने शेती करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे शालेय शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा, नववी ते दहावी माध्यमिक आश्रमशाळा देगाव, डिप्लोमा गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक बीड, डिग्री गव्हर्न्मेंट कॉलेज, कराड येथे पूर्ण झाल्यानंतर भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई येथे एक महिन्याचे ट्रेनिंग घेऊन राजीनामा दिला.
त्यानंतर आॅईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन, पुणे येथे त्याची निवड झाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने (इंजिनिअर सर्व्हिसेस) प्रिलीम जानेवारी महिन्यात व मेन्स परीक्षा जून महिन्यात दिली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. शुक्रवार, २५ आॅक्टोबर रोजी निकाल लागला अन् हर्षलने देशात पहिला येण्याचा मान मिळविला. 

लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. उत्तीर्ण उमेदवारांचा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात मुलाखतींचा टप्पा पार पडला होता. हर्षल भोसले याने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे़ आयोगाने संकेतस्थळावर नुकताच निकाल जाहीर केला आहे.

Web Title: Harshal Bhosale is the first to appear in the IES exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.